Header Ads Widget


महावितरण कंपनीच्या उपकेंद्रात लागली भीषण आग, 80 गावांचा वीज पुरवठा खंडित, सुदैवाने जीवितहानी टळली...

 


खांडबारा प्रतिनिधी/संदिप कोकणी:नवापूर तालुक्यातील खांडबारा जवळ असलेल्या वाटवी गावाजवळील महावितरण कंपनीच्या वीज उपकेंद्रात काल दि. 24 एप्रिल रोजी सायंकाळी साडे पाचवाजेच्या सुमारास विजेच्या शॉटसर्किट मुळे वीज उपकेंद्रात असलेल्या मीटरच्या ढिकाऱ्याजवळ अचानक आग लागली परिसरात असलेला कोरड्या चारा मुळे आग परिसरात झटक्यात पसरली.आग विझवण्यासाठी उपकेंद्रात कोणतीही अग्निशमन यंत्रणा नसल्याने आग विझवण्यासाठी एका कर्मचाऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न केले.मिळेल त्या साधनाने परिसरातून व शेतातून पाणी आणून आग विझविण्याचे प्रयत्न केले.मात्र हवेचा जोर असल्यामुळे आग विझवणे कठीण झाले होते. परंतु नंदुरबार जिल्ह्याचे ठिकाण केवळ 22 किलोमीटर अंतर वर असल्यावर देखील महावितरण कंपनीच्या वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अग्निशमन बंबाला संपर्क साधला नाही का ?यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. आगीचे लोट दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून दिसून येत असल्यामुळे नागरिकांनी वाटवी येथील वीज उपकेंद्राजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महावितरण विभागाच्या या खांडबारा वाटवी विद्युत उपकेंद्र वरून जवळपास 80 गावांत विद्युत पुरवठा केला जातो मात्र या घटनेमुळे दीड तास पर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. तर आग आटोक्यात आणल्यानंतर दीड तासानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला होता.या आगीच्या घटने दरम्यान महावितरण कंपनीच्या कोणतेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नाही तर स्थानिक नागरिक व एका कर्मचाऱ्याने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.यावेळी विद्युत उपकेंद्रातील आग विझवण्यासाठी वापरण्यात येणारे अग्निनिर्वापक यंत्र हे निकामी असल्यामुळे त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. त्यामुळे घटनास्थळी असलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला तर मिळेल त्या साधनाने पाणी आणून आग विझवण्यात स्थानिक नागरिकांनी मदत केली.तर सदर ठिकाणी असलेले जुने मीटर व विद्युत वाहिन्या यांचे ह्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले यात हजारो रूपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही व पुढील अनर्थ टळला...

Post a Comment

0 Comments

|