नंदुरबार शहरातील बोहरी मशिदच्या जवळ सातपीर गल्लीतला अरबाज सलीम खाटीक या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली. हत्या मुळे संपूर्ण शहरात तणाव पसरलेला आहे. आरोपी जयेश गंगाराम गंगावणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेत बाकीच्या कोणी शामिल होते का अशी तपास नंदुरबार शहर पोलिसांकडून सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार अरबाज व त्याची पत्नी जोया यांच्या दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह होता प्रेम विवाहाचे राग जयेश गंगावणे यांचे मनात होता यामुळे त्यांनी अरबाज खाटीक यांना चाकून हल्ला करून निर्गुण हत्या केले 3 फेब्रुवारी रात्री ०७:०० वाजे सुमारास अरबाज व त्याची आई जळका बाजार चौकातून मच्छी बाजार येत होते. बोहरी मशिदीच्या लागून असलेल्या रस्त्याने जात असताना सातपीर बाबा दर्गाच्या समोर जयेश मच्छी बाजार चौकात या रस्त्याने चाकू घेऊन आला त्याने अरबाजला पकडून छातीत चाकू खुपसला.
या हल्ल्यात अरबाज खाटीक यास गंभीर दुखापात झाले. छातीतून मोठ्या प्रमाणावर रक्तश्राव होत होता त्याची आई घटना बघून मोठमोठ्याने आरडाओरड करत होती तिच्या ओरडण्याचा आवाजाने घटनास्थळी काही लोक धावून आले.
त्यानंतर अरबाज चे भाऊ त्याचे सोबत काही लोक अरबाजला घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालय येथे घेऊन गेले. जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी अरबाजला तपासून मयत घोषित केले.
सदर घटस्थाडी शहर पोलीस निरीक्षक कळमकर साहेब व त्याचे पोलीस फाटा धावून आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील साहेब यांचे सूचनानुसार त्या भागातून व जवळच्या भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्या भागात तणाव नियंत्रण असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील साहेब कडून शांततेच्या व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले.
0 Comments