Header Ads Widget


बालिकांनी उच्च शिक्षण घेऊन अधिकारी बनावे. बालिका सन्मान सोहळ्यात बिडीओ चकोर यांचे प्रतिपादन...


उस्मानाबाद!Usamanabad/LivenationNews
प्रतिनिधि/बिलाल कुरेशी

जीवनात येणाऱ्या कठीण परीस्थीतीचा सामना करुन प्रतेक बालिकांनी उच्च शिक्षण घेऊन अधिकारी बनावे असे प्रतीपादन कलापंढरी संस्था लातूरच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या कळंब येथील पंचायत समितीच्या सभागृहात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी केले.
आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पंचायत समिती कळंबचे गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक   आर एस चाटे व तालुका आरोग्य विस्तार अधिकारी श्रीमती एस एल तांदळे आदींची उपस्थिती होती.
 राष्ट्रीय बालिका दिनानिमित किशोरीना नेतृत्व करण्यासाठी व विविध कौशल्य व स्पर्धामध्ये सहभाग दर्शविल्याबद्दल किशोरींचा सन्मान करण्याकरीता सोहळ्याचे आयोजन केले आहे, असे प्रास्ताविकामध्ये कलापंढरी संस्थेचे कार्यक्रम व्यवस्थापक शिवदर्शन सदाकाळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला किशोरीमार्फत स्वागत गीत व संस्थेमार्फत आयोजित शिक्षणाचे महत्व आणि बालविवाह रोखण्यासंदर्भात किशोरी कलापथक सादर करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक आर एल एल चाटे यांनी बालिकांच्या संरक्षणासंदर्भात पोलिसांमार्फत असणाऱ्या सुविधांची माहिती दिली, यावेळी पोलीस काका व पोलिस दीदी याविषयी, चाईल्डलाईन हेल्पलाईन बाबत जागृत केले. मुलीनी कुठल्याही परिस्थितीत न घाबरता एखादा प्रसंग ओढवल्यास तात्काळ पोलिसांची कशी मदत घेता येईल याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर तालुका आरोग्य विस्तार अधिकारी श्रीमती एस एल तांदळे यांनी मुलींच्या आरोग्याविषयी शासनामार्फत राबवीत असलेल्या विविध योजना, सोयी सुविधांची माहिती दिली. मुलींनी त्यांच्या आरोग्याची आणि मासिक पाळी दरम्यान कशी काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करून चर्चा केली. 
दुपारच्या सत्रामध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी यावेळी पंचायत समिती मार्फत व आपल्या गावातील आशाताई, आरोग्य केंद्र व बाल संरक्षण समिती,  हिमोग्लोबिन तपासणी व इतर विविध योजनांची विस्तृत माहिती दिली. तसेच प्रत्येक मुलीने विविध क्षेत्रात ज्ञान अवगत करावे, शासकीय व सामाजिक संस्थाच्या उपक्रमातून मिळणाऱ्या संधीचा लाभ घ्यावे व प्रत्येक क्षेत्रातील नोकरी मध्ये आपले अस्तित्व वाढवावे यासाठी उच्च शिक्षण घेण्याकरीता प्रवृत्त केले. शिवदर्शन सदाकाळे यांनी संस्थेच्या कामाची माहिती, उस्मानाबाद जिल्ह्यात चालणाऱ्या बालकांच्या संरक्षण आणि अधिकारासंबंधी माहिती व विशेषत: किशोरीसाठी राबवीत असलेल्या उपक्रमाची माहिती व माहितीपट याद्वारे मांडणी करून किशोरीना प्रेरणा दिली. तर कांचन भोसले यांनी उस्मानाबाद तालुक्यात सुरु असलेल्या कामाची माहिती देऊन मुलीशी संवाद साधला.
या कार्यक्रमा दरम्यान प्रत्येक मुलीनी संस्थेच्या कार्यामुळे आपल्यामध्ये झालेले सकारात्मक बदल याबाबत मनोगत व्यक्त केले, यामध्ये जीवन कौशल्य शिक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, नेतृत्व विकास, आकाशवाणी प्रसारणामध्ये सहभाग, बालवाणी टोल फ्री क्रमांक ९२६६६५७८८८ यावर सादरीकरण करण्यास मिळत असलेल्या संधी आणि किशोरी बैठकीमुळे होत असलेले बदल याबाबत याचा उल्लेख केला. यानंतर सहभागी बालिकाना विविध कौशल्यातील सहभागीता व विशेष प्राविण्यनुसार प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
 यावेळी कलापंढरी संस्थेचे उमा शितोळे, समाधान गोसावी, अश्विनी भोरे, प्रितम पवार व कोमल गुंड हे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उस्मानाबाद जिल्ह्याचे समन्वयक आशिष लगाडे यांनी केले तर आभार  प्रीतम पवार यांनी व्यक्त केळे. या कार्यक्रमासाठी कळंब  तालुक्यातील ५० बालिका सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यानी परीश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|