Header Ads Widget


शहादा शहराजवळ बसचा भीषण अपघात ! १५ प्रवासी असल्याची माहिती

नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या शहाद्यात एका बसचा भीषण अपघात झाला आहे. बस मध्ये १५ प्रवासी असून जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.


नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा येथे सुरत - खरगोन बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हाइडरला धडकली आणि पलटी झाली. बसमधील १५ प्रवासी जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील सुरतयेथून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या सुरत - खरगोन बसचा नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील १३२ केवी सब स्टेशनजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे. अपघातात बस पलटी होऊन १५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर शहादा शहरातील खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात येत आहे.


पहाटे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आवाज झाला आणि प्रवाशांनी मदतीची याचना करण्यासाठी गोंगाट केल्याने स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासन यांनी मदतीसाठी धाव घेतली. उलटलेल्या बसमधून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments

|