नंदुरबार/प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील कोठली आश्रम शाळेतील विद्यार्थिनी सोनिया वाड्या नाईक खिडकीला दोरीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेने नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार तालुक्यातील कोठली येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील आठवीत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील खुर्चीमाळ येथील १३ वर्षे ११ महिने दोन दिवसांच्या विद्यार्थिनीने ती राहत असलेल्या आश्रमशाळेतील मजल्यावर गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. तिने गळफास का घेतला याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
विद्यार्थिनीचा मृत्यदेह नातेवाईक आल्यावर त्यांना सोपविण्यात आला. पुढील तपासणी अहवालासाठी नंदुरबार जिल्हा रुणालयात पोलिस बंदोवस्तात पाठविण्यात आला.
घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संजय महाजन, उपनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय वसावे, उपनिरीक्षक जगन वळवी, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, विस्तार अधिकारी निर्मल माळी, जमादार वंतू गावित आदी घटनास्थळी उपस्थित होते.
आत्महत्येचा कारण वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यावरच घटनेची उकल करता येईल.
सर्व समाज बांधव,विविध संघटना , सामाजिक कार्यकर्ता मार्फत सदर घटनेची सखोल चौकशी करून,दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी जोर धरू लागली आहे..
0 Comments