Header Ads Widget


मंदिर परिसरात गोळ्या झाडत धारदार शस्त्रांनी वार करून हत्या; दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेनं खळबळ


नंदुरबार : नंदुरबार शहर खुनाच्या घटनेमुळे हादरून गेले आहे. शहरातील उमापती महादेव मंदिर परिसरात कृष्णा पेंढारकर या व्यक्तीचा खून करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून घटनेचा अधिकचा तपास सुरू केला आहे.


प्राप्त माहितीनुसार, नंदुरबार शहरातील उमापती महादेव मंदिर परिसरात दुपारच्या सुमारास कृष्णा पेंढारकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तसंच धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करण्यात आले. यावेळी पेंढारकर यांच्या डोक्यात दगड टाकून त्यांना गंभीर जखमी कारण्यात आले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पेंढारकर यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या खूनप्रकरणी एकाने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे.

नंदुरबार पोलिसांनी तीव्र गतीने खुनाचा अधिकचा तपास सुरू आहे. या खुनाच्या घटनेमुळे नंदुरबार शहरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येप्रकरणी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .यापैकी एकाला नंदुरबार पोलिसांनी अटक केलेली आहे. पूर्ववमनस्यातून हा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Post a Comment

0 Comments

|