नंदुरबार/ प्रतिनिधी:नंदुरबार जिल्ह्यातील लाचलुचपतची प्रमाण वाढले असून काही दिवसांपूर्वीच नवापूर नायब तहसीलदार यांना व आज नवापूर येथेच नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना, रंगेहाथ पकडल्याने नवापूर शहरासह जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यावर, नासिक लाच लचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुजरात राज्यात एका आरोपीवर गुन्हा असल्याने या आरोपीला अटक न करण्यासाठी, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी दीड लाखाची मागणी केली होती, त्यापैकी एक लाख दिले गेले होते, व उर्वरित 50 हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना रंगेहाथ अटक केली आहे, पोलीस निरीक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होताच, नवापूर शहरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या विरोधात, जोरदार घोषणाबाजी करत, त्यांच्या पोलीस गाड्यांवर दगडफेक केली, वारंवार खोटे चुकीचे गुन्हे दाखल करत होते, तर ते भ्रष्ट अधिकारी होते, त्यामुळे यांच्यावर झालेली कारवाई योग्यच असून, या जमावाने शासकीय वाहनांवर दगडफेक करून आपला रोष व्यक्त केला, पोलीस निरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यवाही झाल्याने, नवापूर पोलीस ठाण्यासह नंदुरबार जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
0 Comments