नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व श.ता.एज्यू.सोसायटी.अँड को.- ऑप.एज्यू. सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेट रिसर्च अँड डेव्हलपमेंट शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास विभाग व युवती सभेअंतर्गत संचालक डॉ. अनिल रंगराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा दिवसीय 'आत्मनिर्भर युवती अभियान' कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत विविध विषयांवर व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी 'सायबर क्राईम आणि सोशल मीडिया जागरूकता आणि सुरक्षा' या विषयावर अॅडव्हाकेट डॉ. अब्दुल जब्बार शेख, शहादा यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी 'बँकिंग व्यवहार माहिती आणि सावधगिरी' या विषयावर विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे सहा. प्रा. इरफान पठाण यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी महिला आरोग्य : समस्या व उपाय' या विषयावर डॉ. सोनाली पाटील यांनी विद्यार्थिनींसोबत संवाद साधला. कार्यशाळेच्या चौथ्या दिवशी 'स्त्री स्वयंरोजगार माहिती आणि संधी ' या विषयावर पिरामल फाउंडेशन चे रमेश जयंकर यांनी ‘गांधी रिसर्च फेलोशिप व अनेक रोजगाराच्या संधी’ बाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या पाचव्या दिवशी शितल अकॅडमी चे संचालक योगेश शेंडे यांनी 'नेतृत्व गुण सॉफ्ट स्किल सर्वांगीण विकास ' या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.कार्यशाळेचा समारोप सहाव्या दिवशी विद्यार्थिनींनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन करून करण्यात आला. समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष व पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन चे परीक्षक म्हणून महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय. जे. पाटील, संचालक डॉ. अनिल पाटील तसेच विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप मराठे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. विजयकुमार गायकवाड, महिला विद्यार्थी विकास अधिकारी, प्रा. श्वेता पाटील, विभागप्रमुख प्रा. ताहीर मन्सुरी, प्रा. गायत्री पाटील, प्रा.नेहा देवरे यांनी परिश्रम घेतले.कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष वनश्री मोतीलाल फकिरा पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष हिरालाल पाटील, सचिव ए.के पटेल, संचालक तथा शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, महाविद्यालय विकास समिती सदस्या सौ. प्रितीताई पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments