नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील शेठ व्ही.के.शहा विद्यालयाचा परीक्षा केंद्रावर तालुकास्तरीय महाराष्ट्र प्रज्ञा परीक्षा दिनांक २३ एप्रिल रोजी संपन्न झाली. महाराष्ट्र शासन शिक्षण विभागातर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी.इतर ज्ञान त्यांना मिळावे म्हणून परीक्षा आयोजित केली जात असते.शहादा तालुक्यातील एकूण १०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यात आली.यावेळी परीक्षा केंद्रावर पालकांनी आपल्या पाल्यांसाठी परीक्षा संपेपर्यंत गर्दी केलेली होती.विद्यालयाचे प्राचार्य आय.डी.पटेल होते तर त्यांना सहाय्यक म्हणून तळोदा येथील वरिष्ठ पर्यवेक्षक दिलीप छगन पटेल शहादा येथील उपमुख्याध्यापक एस.आर. जाधव पर्यवेक्षक सी.जी.पटेल, व्ही इ. जावरे यांनी सहकार्य केले.
0 Comments