Header Ads Widget


जायंन्टस ग्रुप तर्फे जागतिक पुस्तक दिन साजरा...

 



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील जायन्टस ग्रुप व जायन्टस सहेली ग्रुप शहादा तर्फे जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमत सर्वप्रथम डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या फोटोचे पुजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा आर टी पाटील होते तर प्रमुख पाहुणे जायंन्टस ग्रुप चे अध्यक्ष डॉ विवेक पाटील, सहेली अध्यक्षा स्वाती पाटील, फेडरेशनचे माणक चौधरी डॉ लकेशकुमार पाटील, भूषण बाविस्कर , सतीश जव्हेरी दिपाली बाविस्कर आदी उपस्थित होते. या वेळी डॉ विवेक पाटील प्रा आर टी पाटील यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी संचिता नितीन भामरे, आस्था मुनेश जगदेव,सुहानी अमित खंडेलवाल, प्राजक्ता रविंद्र इशी, अक्षरा महाजन यांच्या मान्यवरांचा हस्ते सन्मान पत्र व बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणक चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन भूषण बाविस्कर व आभार स्वाती पाटील यांनी मांडले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी जायंन्टसच्या सदस्यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments

|