Header Ads Widget


अवैधरित्या गावठी हातभट्टीच्या दारुची विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर साक्री पोलीसांची धडक कारवाई....

 



गावठी हातभट्टीची दारुसह मोटारसायकल व दोन मोबाईल असा एकुण ९२,०००/- रु. किंमतीचा मुद्येमाल केला जप्त.

साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: दि.२४/०४/२०२४ रोजी सकाळी ०६.०० वाजेच्या सुमारास पोसई प्रसाद रौंदळ, असई राजु जाधव, असई रामलाल अहिरे, पोकॉ/१४८३ प्रमोद जाधव व पोकॉ/१४८४ दिनेश मावची असे दहिवेल पोलीस दुरक्षेत्र येथे हजर असतांना मा. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मोरकरंजा ता.नवापुर जि. नंदुरबार येथुन साक्रीकडे दोन इसम मोटारसायकलवर गावठी हातभट्टीच्या दारुची वाहतुक करुन घेऊन जात आहे, अशी माहिती मिळाल्याने साक्री पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी पोसई प्रसाद रौंदळ यांना सदर इसमांवर कारवाई करणेबाबत आदेशित केले. त्या आदेशान्वे सकाळी ०६/५० वाजेच्या सुमारास पोसई रौंदळ हे त्यांच्या पथकासह महामार्ग क्र ०६ नवापुर ते साक्री हायवे रोडवरील कोंडाईबारी घाटातील हनुमान मंदीराच्या अलिकडे विसरवाडी कडुन दहिवेल कडे येणाऱ्या रोडचे अलिकडे उभे असतांना विसरवाडी कडुन दहिवेल कडे येणाऱ्या एक लाल काळया रंगाची बजाज कंपनीची पल्सर मो.सा.क्र. MH-१८-AR-२१९९ हिचेवर दोन इसम त्यांचेमध्ये ०२ मोठ्या व ०१ लहान अशा एकुण ०३ प्लॅस्टिकच्या गोण्यासह वाहतुक करतांना मिळुन आले. सदर इसमांना थांबवुन त्यांची झडती घेतली असता त्यांचे कब्जात असलेल्या प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये गावठी हातभट्टीची दारु भरलेली मिळुन आली. सदर इसमांना त्यांचे पूर्ण नाव गाव विचारले असता १) नितीन सतिश गावित, वय-२२, रा. मोरकरंजा, ता. नवापुर, जि. नंदुरबार व २) नितेश मधुकर गावित, वय-२६, रा. मोरकरंजा, ता. नवापुर, जि. नंदुरबार असे सांगितले. तसेच सदरची हातभट्टीची दारु ही भिमसिंग जिवल्या गावित, रा.मोरकरंजा, ता. नवापुर, जि. नंदुरबार याच्या मालकीची असुन त्याचे सांगणेवरुन वाहतुक करत असल्याचे सांगितले. वर नमुद इसमांकडुन गावठी हातभट्टीची दारु, मोटारसायकल व दोन मोबाईल असा एकुण ९२,०००/- रु किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. तरी इसम नामे १) नितीन सतिश गावित, वय-२२ वर्ष, २) नितेश मधुकर गावित, वय- २६ वर्ष, ३) भिमसिंग जिवल्या गावित, सर्व रा. मोरकरंजा, ता. नवापुर, जि. नंदुरबार यांचेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ), ६५ (ई) प्रमाणे साक्री पोलीस स्टेशन अभिलेखावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे सो, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.किशोर काळे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. साजन सोनवणे सो यांचे मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी तसेच पथकातील पोसई प्रसाद रौंदळ, असई राजु जाधव, असई रामलाल अहिरे, पोकॉ/१४८३ प्रमोद जाधव व पोकॉ/१४८४ दिनेश मावची अशा पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments

|