साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: साक्री तालुक्यात वासखेडी शिवारात चारचाकी वाहन व मोटरसायकल मध्ये अपघात होवून चुलत भाऊ व बहीण ठार झाल्याची घटना घडली आहे, मिळालेल्या माहितीनुसार साक्री तालुक्यातील निजामपूर शहरापासून अवघ्या काही अंतरावरच असलेल्या सरवड ते कोडांईबारी रस्त्यावरील वासखेडी शिवारातील खडकीनाल्या जवळ निजामपूरहून वासखेडी कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने पुढे चालणाऱ्या मोटरसायकल वाहनाला मागून जोरदार धडक दिली या भीषण अपघातात मोटर सायकल वरील वासखेडी येथील चुलत भाऊ बहिण खडक्या नाल्यात जाऊन पडल्या ने जागीच ठार झाले. दि.२२ रोजी दुपारी ०४:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली, घटनास्थळावरून चालक फरार झाला असून या प्रकरणी निजामपूर पोलीस स्टेशनला रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला.दोघा चुलत भाऊ बहिणीवर दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आला या वेळी गावात मोठा आक्रोश होता.
पोलीसांनी दिलेल्या माहिती वरून वासखेडी येथील मुरलीधर दगाजी नेरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले कि,वासखेडी येथील रहिवासी तुषार नेरकर व चुलत बहिण संगीताबाई अनिल सुर्यवंशी हीच्या सोबत जैताणे निजामपूर येथील आठवडे बाजाराला गेले असल्याचे कळाले असता मोटरसायकल क्रमांक एम.एच.३९ जी.९१०० या वाहनाने वासखेडी गावाकडे येताना याच मार्गावरून निजामपूर कडून वासखेडी येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक -एम.एच.३९एम.०१२८ या वाहनाने पुढील मोटरसायकल ला जोरदार धडक दिल्याने मोटर सायकल वरील तुषार नेरकर व संगिता सुर्यवंशी हे दोघे चुलत भाऊ बहिण मोटारसायकल वरुन रस्त्याच्याकडेला असलेल्या खडकीनाल्यात जाऊन पडले या भीषण अपघातात दोघे भाऊ बहिण जागीच ठार झाल्याची बातमी फिर्यादी मुरलीधर नेरकर यांना कळताच त्यांनी या घटनेची माहिती वासखेडी गावातील नातेवाईक वैभव सुर्यवंशी,जितेद्र दहिते,जगदिश साबळे,रावसाहेब देवरे,विलास नांद्रे,यांना कळविली असता सर्व नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले असता रस्त्याच्याकडे जवळील खडक्यानाल्यात तुषार नेरकर व संगिता सुर्यवंशी हे दोघे मृत अवस्थेत दिसून आले या घटनेची माहिती वासखेडी गावात पसरताच घटनास्थळी रस्त्यावर नातेवाईकासह ग्रामस्थांनी वाहन चालक फरार झाल्याने काही काळ रस्तारोको केल्याने वाहतुकाची कोंडी झाली होती. निजामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली .या प्रकरणी निजामपूर पोलीस स्टेशनला अज्ञात चालकाविरुध्द भादंवी कलम ३०४( अ ),२७९,३३७,३३८,४२७ सह मोटर वाहन कायदा कलम १८४,१३४/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढिल तपास निजामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड करीत आहे.
0 Comments