Header Ads Widget


शेवाळीत हनुमान जन्मोत्सव निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन....

साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: दि.२३ वार मंळवारी रोजी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी (दा.) गावात हनुमान जन्मोत्सव निमित्ताने सार्वजनिक ग्रामस्थ व सर्व तरूण मिञ परिवारातर्फे गावातील हनुमान मंदीर जवळ विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात संध्याकाळी डिजे वरती भक्तिसंगीत वाजवून नंतर महाआरती करीत रात्री ८ वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी गावातील हजारो नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील तरुण मिञ परिवाराने विशेष मेहनत घेतली होती.

Post a Comment

0 Comments

|