Header Ads Widget


दोन मोटरसायकलींमध्ये जोरदार समोरासमोर ठोस होऊन; भीषण अपघातात चार जण ठार...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा तालुक्यातील  पाडळदा-म्हसावद रस्त्यावर बुडीगव्हाण गावाजवळ वळणावर दोन मोटरसायकलींमध्ये जोरदार समोरासमोर ठोस होऊन या भीषण अपघातात चार जण ठार झाल्याची घटना घडली असून मयतांमध्ये इस्लामपूर येथील उपसरपंचाचा समावेश आहे.अपघात एवढा भीषण होता की एक मोटर सायकल पूर्णतः जळून खाक झाली आहे.अपघात स्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.अक्षरशः रस्त्यावर मयत झालेल्या व्यक्तींची प्रेते इतरस्ता फेकले गेलेले होते.दिनांक २३ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता पाडळदा तालुका शहादा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर बुडीगव्हाण गावाजवळ मोटरसायकल क्रमांक एम.एच.३९।ए.इ.।१४०२ व एक मोटरसायकल अपघातात पूर्ण जळालेली समोरासमोर आल्याने जोरदार ठोस झाली.ठोस इतकी जबरदस्त होती की दोन्ही मोटरसायकलस्वारांना संधी मिळाली नाही.अक्षरशः रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत लांबपर्यंत फेकले गेलेत.रस्त्यावर रक्ताच्या सडा पडलेला होता.बूट चप्पल मोटर सायकलिंचे स्पेअर पार्ट विखुरलेले होते.अपघाताचे वृत्त कळताच पाडळदा बुडी गव्हाण म्हसावद येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.

घटनेचे वृत्त कळताच म्हसावद पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह धाव घेऊन सर्वांना म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.पाडळदा-म्हसावद रस्त्यावर अपघातामुळे रहदारी ठप्प झाली होती.पोलिसांनी नंतर सुरळीत सुरू करून रस्त्यावर पडलेल्या मोटरसायकली व इतर वस्तू बाजूला केल्या.उशिरापर्यंत एक मोटर सायकल पूर्णता जळून खात झालेली जळतच होती.म्हसावद पोलिसात गुन्ह्याची नोंद करून शहादा पोलिसात वर्ग करण्यात आलेला आहे.अपघातात जे चार जण ठार झाले आहे त्यात लतीफ नवी खाटीक उपसरपंच वय ७० राहणार इस्लामपूर अतिश दशरथ बर्डे वय ३० राहणार उमरटी पोलीस पाटील दशरथ बर्डे यांच्या मुलगा उघड्या सुपा पवार वय ५१ राहणार राहणार टवळाई व स्वराज सुरेश ठाकरे वय ३३ राहणार फत्तेपूर सर्व तालुका शहादा यांच्या समावेश आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.म्हसावद ग्रामीण रुग्णालयात अपघातात मयत झालेल्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.नातेवाईकांनी अक्षरशः हंबरडा फोडला होता.मोठा जमाव जमा झाल्याने प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळून हळूहळू जमाव नातेवाईकांची गर्दी कमी केली.उशिरापर्यंत म्हसावद ग्रामीण रुग्णालयात अपघातातील मयतांचे शवविच्छेदन सुरू होते.

Post a Comment

0 Comments

|