Header Ads Widget


भादा येथे हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम करून भंडारा प्रसाद वाटप

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा तालुक्यातील भादा येथे श्री सिद्ध पीठ पंचतत्व हनुमान मंदिर भादेश्वर धाम या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम करून भंडारा प्रसाद वाटप करण्यात आले. भादा या ठिकाणी असलेले हनुमान मंदिर हे परिसरातील भाविकांचे एक श्रद्धास्थान आहे साधारण एक हजार वर्षांपूर्वी स्थापन झालेले स्वयंभू हनुमान मंदिर याची ख्याती नवसाला पावणारा हनुमान म्हणून आहे. हनुमान जयंतीनिमित्त शेखर महाराज यांच्या सुश्राव्यवाणीतून सुरुवातीला संकल्प तिलक गणपती पुण्य वाचन मातृका स्थापन अग्निस्थापन नवग्रह स्थापन हवनपूर्णावती दश दीपक पाल पूर्ण आरती आशीर्वाद आरती अशे विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. 
हवन करण्यासाठी एकूण नऊ जोडपे त्या ठिकाणी बसविण्यात आले होते यात प्रा. गणेश सोनवणे, प्रकाश ठाकरे ,रवींद्र भोई, प्रवीण भोई, भिका मोरे, संदीप मोरे, संतोष भोई, सुनील भोई, कृष्णा जाधव जवळपास तीन तास चाललेल्या या धार्मिक सोहळ्यामध्ये परिसरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. हनुमान जयंती निमित्त मंदिरातील हनुमानाला नव्याने शेंदुर लेपण करून सजविण्यात आले होते तसेच मंदिर गाभारा हा देखील सजविण्यात आलेला होता.इस 2004 पासून मी या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम करत असल्याचे महाराजांनी सांगितले. दहा वर्षापासून भंडारा प्रसादाचे आयोजन करण्यात आल्याचे शुभम सोनार यांनी सांगितले सुरुवातीला सोनार परिवाराकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असायचे परंतु नंतर भादे व शहादा परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने धार्मिक कार्यक्रम तथा भंडारा प्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावेळी असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. सकाळपासून दर्शनासाठी परिसरातील महिला व पुरुष वर्गांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments

|