Header Ads Widget


हनुमान जन्मोत्सव निमित्त वेगवेगळ्या मंदिरांमध्ये धार्मिक पूजा विधी करून महाप्रसाद वाटप...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा शहरात आज रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्त वेगवेगळ्या मंदिरांमध्ये धार्मिक पूजा विधी करून महाप्रसाद वाटप करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.हजारो भाविकांनी हनुमानजीचे दर्शन घेऊनू महाप्रसादाच्या लाभ घेतला.शहरातील वातावरण भक्तीमय झालेले होते.शहादा शहरातील बसस्थानक समोरील महावीर बजरंगबली मंदिरात सकाळपासून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.पहाटेपासूनच हनुमानजींचे वेगवेगळे धार्मिक गाणे सुरू करण्यात आलेले होते.सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली होती.साधारणता दोन ते अडीच हजार भाविकांनी महाप्रसादाच्या लाभ घेतला.मंदिराला लागूनच मंडप लावण्यात आलेला होता.मसाले भात व बुंदी प्रसाद म्हणून भाविकांना वाटप करण्यात आले.हनुमानजीला मूर्ती समोर ५६ नैवेद्यांच्या भाेग दाखवण्यात आला.भोग नैवद्य आर.सी.पटेल पिनाकिन पटेल अरविंद भावसार मनोज अग्रवाल सुरेश बैद यांच्यामार्फत देण्यात आला.महावीर बजरंगबली मंदिराच्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते कल्पेश पटेल पिनाकिन पटेल रोहन माळी ज्येष्ठ नेते अजय शर्मा युवा कार्यकर्ते समीर चोरडिया प्रवीण जैन महेश पाटील उपस्थित होते.सकाळपासून धार्मिक पूजा विधी व महाआरती पुजारी तुषार शास्त्री यांनी केली.शहरातील दोंडाईचा रस्त्यावरील प्रेस मारुती मंदिरात पहाटे साडेतीन वाजता महारुद्र पूजा सकाळी पाच वाजता अभिषेक सहा वाजता महाआरती तसेच रोहिदास चौधरी यांनी सपत्नीक सत्यनारायण पूजा केली.मंदिराच्या आवारात मोठा मंडप लावून सकाळी दहा वाजेपासून महाप्रसाद भंडारा वाटप केला.साधारणता दीड ते दोन हजार भाविकांनी दर्शन घेऊन प्रसादाच्या लाभ घेतला.प्रेस मारुती मंदिरात भाविकांनी रुचकीच्या माळा अर्पित केल्या.विशेष म्हणजे महिला भाविकांची संख्या मोठी होती.पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. शहरातील खोल गल्ली हनुमान व्यायाम शाळे जवळील हनुमान मंदिरात देखील हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.मंदिरात परिसरातील भाविकांनी दर्शन घेतले तर उंटावद तालुका शहादा येथील पुरातन रोकडमल हनुमान मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले होते.शहादा शहराच्या पलीकडे मंदिर असल्याने शहरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली होती.ग्रामीण भागातील भाविक देखील मोठ्या संख्येने आपापल्या खाजगी वाहनांनी दर्शनासाठी आलेले होते.

Post a Comment

0 Comments

|