Header Ads Widget


नांदरखी येथे अंगावर विज कोसळून युवकाचा मृत्यू....

साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशन च्या हद्दीतील नांदरखी येथे शेतात चारा गोळा करीत असतांना विज कोसळून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२२) घडली. घटनेची खबर मयत युवकाचे मामा स्वप्निल भिमसिंग गावीत(रा.उबंडीं,पोस्ट रायपुर ता.नवापुर जि. नंदुरबार) यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनला दिली त्यांनी दिलेल्या खबरीनुसार, दि.२२/०४/२०२४ सोमवारी रोजी सकाळी ०८:३० वाजेचे सुमारास त्यांना प्रिती आटया कुवर रा.नांदरखी ता.साक्री, जि.धुळे हिने फोनवरुन माहिती दिली कि,नांदरखी शिवारात मधुकर आटया कुवर यांचे शेतात प्रिती अनिल कुवर, धनश्री जितेंद्र कुवर असे शेतात चारा गोळा करीत असतांना सोबत असलेला वैभव मधुकर कुवर (वय १६) रा.नांदरखी याचे अंगावर वीज पडुन दुखापती झाली आहे म्हणुन ते सदर ठिकाणी पोहचुन दुखापती वैभव मधुकर कुवर यास खाजगी वाहनाने ग्रामिण रुग्णालय, पिपंळनेर येथे उपचारासाठी ०९:१० वाजता दाखल केले असता डॉ.राकेश मोहने यांनी उपचारादरम्यान वैभव मधुकर कुवर यास सकाळी ०९:३० वाजता मयत घोषीत केले या प्रकरणी पिंपळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू नोंद करण्यास आली असून पुढील तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे ए.एस.आय बापू पिंपळे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|