Header Ads Widget


शहादा येथील कलाल महिला मंडळाची स्थापना..

    वैशाली विलास जावरे ,(अध्यक्ष)

       संगीता प्रकाश कलाल,(उपाध्यक्ष)
     मालती कृष्णकांत काळकर (सचिव)
   योगिता तुषार कलाल (सहसचिव)

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:नुकतीच शहादा कलाल महिला मंडळाची स्थापना करण्यात आली. गेल्या तीन वर्षापासून शहादा कलाल महिला मंडळ अस्तित्वात नव्हते. सर्व महिला ह्या एकत्रित आल्या आणि या ठिकाणी सर्वांनुमते वैशाली विलास जावरे यांचे अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी संगीता प्रकाश कलाल , सचिव पदी मालती कृष्णकांत काळकर, सहसचिव पदी योगिता तुषार कलाल यांची निवड करण्यात आली. महिला मंडळांची सर्वसाधारण सभा ही सौभाग्य मंगल कार्यालय जवळ असलेल्या प्रा. विलास जावरे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करून महिला मंडळ स्थापन करावे असा एकमताने ठराव करण्यात आला व वरील कार्यकारणी निवडण्यात आली. हेमांगी जावरे यांनी आपण मासिक मीटिंग मध्ये प्रत्येकाच्या घरी दुर्गा सप्तशतीचे पाठ सुरू करावे अशी नवीन संकल्पना मांडली व त्यावर एकमताने सहमती दाखवण्यात आली दुर्गा सप्तशतीच्या पाठ केल्याने आपल्या सोबत आपल्या परिवाराचे कल्याण होऊन एक भक्तिमय वातावरण तयार होईल यावर सर्वांनी सहमती दाखविली.आपल्या समाजातील महिला भगिनी हे कुठे मागे नाहीत ज्या क्षेत्रात ते काम करतात तेथे त्यांच्या ठसा उमटवीत असतात व त्यांना प्रोत्साहन व चालना देण्यासाठी मी सदैव तत्पर राहील त्याचप्रमाणे समाज, समाजातील घटक हा शिक्षण किंवा इतर गोष्टीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेईल व आपल्याजवळ काही संकल्पना असतील तर त्या देखील आमच्यासोबत मांडाव्यात त्याच्यावर सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे प्रतिपादन समाज मंडळाच्या महिला अध्यक्ष वैशाली जावरे यांनी केले.यावेळी शहादा तालुक्यातील व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमांगी जावरे यांनी केले .

Post a Comment

0 Comments

|