Header Ads Widget


माहेश्वरी महिला महामंडळ तर्फे भागवत शब्दांच्या आयोजन ...


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील काशीमा नगर मधील गजानन महाराज मंदिर या ठिकाणी माहेश्वरी महिला महामंडळ तर्फे भागवत शब्दांच्या आयोजन करण्यात आले आहे. 18 एप्रिल पासून सुरू झालेल्या भागवत कथेत 22 एप्रिल रोजी कृष्णजन्म आयोजित करण्यात आला होता यावेळी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.भागवत कथेचे निरूपण ह भ प कागेंद्र महाराज यांच्या वाणीतून सुरू आहे. यावेळी नरेंद्र महाराज बोलताना म्हणाले की पैसा कमावण्यासाठी जेवढी बुद्धी लागत नाही तेवढी त्याच्या वापर करण्यासाठी लागत असते. आणि म्हणून पैसा हा मर्यादित असावा व त्याच्या योग्य पद्धतीने वापर करण्यात यावा पैसा पाणी आणि पुण्य या संचित करण्याच्या गोष्टी आहेत. भागवत कथा हे एक विज्ञान आहे. आपणास सुखी राहायचे असेल तर परमेश्वर गुरु आई वडील यांना सदा प्रणाम करत रहा त्यांचे आशीर्वाद घेत रहा. यामुळे कुठल्याही प्रकारचे क्लेश निर्माण होत नाही आजारपण व मरण सांगून येत नाही पण राजा व परमेश्वर येताना सूचना देऊन येत असतं पैसा कधीही आपल्या प्रारब्ध बदलत नाही त्यामुळे परिचय परिधान राहणीमान बदलू शकते म्हणून जे प्रारब्धात आहे ते कधीच चुकणार नाही. पुढे बोलताना महाराज म्हणाले की प्रगती करायची असेल तर प्रेम बाजूला ठेवा त्यात प्रगती आणायची नाही धर्मकार्य करण्यासाठी सुख सोडावे लागते धर्म कार्य करण्यासाठी कुठल्याही सुखाची अपेक्षा ठेवू नये. खगेंद्र महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून सुरू असलेल्या कथेतून समाजप्रबोधनाचे काम मोठ्या प्रमाणामध्ये होत असते अगदी भक्तिमय वातावरणामध्ये कृष्णजन्मोत्सव साजरा करण्यात आला कृष्ण जन्माचे महत्त्व यावेळी त्यांनी सांगितले. वासुदेवाची भूमिका डॉक्टर योगेश चौधरी यांनी केले कृष्ण मंडपात आल्यानंतर महिला भगिनी व पुरुष भक्तिमय वातावरणामध्ये ताल व ठेका घेऊन नाचत होते. भागवत कथेच्या समारोप 25 तारखेला होणार असल्याची माहिती आयोजकांमार्फत देण्यात आली. परिसरातील महिला व भाविक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहत आहे व कथेच्या लाभ घेत आहेत

Post a Comment

0 Comments

|