नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:उन्हाची तीव्रता लक्षात घेत सेवाभावे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील पाणपोई सुरू करण्यात आली.दिनांक 22-04-2024 वार सोमवार रोजी तळोदा येथे सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे स्वर्गीय भारतसा खुशालसा सोनवणे यांच्या स्मरणार्थ पाणीपोईचे उद्घाटन करण्यात आले.सर्वप्रथम भारत माता व स्वर्गीय भारतसा खुशालसा सोनवणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पूजन करून पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.प्रतिमा पूजन करताना धुळे येथील सेवानिवृत्त वन अधिकारी श्री. अरुणसा अण्णा कलाल व गजानन कृषी सेवा केंद्र चे संचालक श्री.सुभाष जी चौधरी व सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी उपस्थित कृषिधन ऍग्रो चे संचालक श्री निलेश शांताराम पाटील,विश्व हिंदू परिषदेचे प्रांत विशेष सह संपर्कप्रमुख श्री.विजयराव सोनवणे,भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री.श्यामभाऊ राजपूत, विं.हि.प जिल्हा सेवा प्रमुख डॉ.शांतीलाल पिंपळे, जिल्हा समरसता प्रमुख श्री.छोटू नाना सोनवणे, कलाल समाज उपाध्यक्ष श्री.देवेंद्र जयंतसा कलाल प्रखंड सेवा प्रमुख श्री.भरत कलाल सर,प्रखंड समरसता प्रमुख श्री.ललित पाटील,प्रखंड सत्संग प्रमुख श्री.भूपेंद्र बारी,शहर अध्यक्ष श्री.मोहनसिंग भैय्या रघुवंशी,शहर सहमंत्री श्री.संदीप साळी,शहर विशेष संपर्कप्रमुख श्री.राजेंद्र चौधरी,पत्रकार चेतन इंगळे सर,संजय कलाल हे उपस्थित होते यावेळी प्रखंड सेवा प्रमुख श्री.भरतजी कलाल सर हे म्हणालेत की, उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे व सध्याचे तापमान देखील तळोदा 44 डिग्री पर्यंत जात आहे सेवाभावे प्रतिष्ठानाच्या वतीने दरवर्षी पाणीपोईची सुरू करण्यात येत असते.तसंच यावर्षी देखील प्रतिष्ठानने सुरू केले आहे. प्रतिष्ठान वेगवेगळे उपक्रम नेहमी घेत असते. या कार्यक्रमाची नियोजन सेवाभावे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री.सागर पाटील सचिव श्रीमती.कविता दिलीपसा कलाल कार्याध्यक्ष श्री.संतोष चौधरी संचालक श्री.अतुल पाटील,श्री.नकुल ठाकरे,श्री.अनिल नाईक,श्री.पवन सोनवणे यांनी केले
0 Comments