Header Ads Widget


कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश ! त्यांच्यासोबत अ‍ॅड. विलास नाईक यांनीही पक्षात जाहीर प्रवेश केला.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत अ‍ॅड. विलास नाईक यांनीही पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे पक्षाच्या वतीने स्वागत केले.

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजितदादांनी घेतलेला महत्वपूर्ण निर्णय धर्मनिरपेक्ष विचारापासून अजिबात ढळलेला नाही हे सिद्ध होते. मुश्ताक अंतुले हे रायगड लोकसभा मतदारसंघात फिरतीलच परंतु संपूर्ण महाराष्ट्रात अजित पवारांसोबतही फिरत आहेत हे समजले तर राजकारणाला नक्कीच बळकटी मिळेल.


आपल्या पक्षावर अल्पसंख्याक समाज नाराज असे वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र शिव - शाहू - फुले - आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन पक्ष काम करत आहे. बॅ. ए. आर अंतुले यांच्यामुळे राज्यमंत्री हे पद महाराष्ट्रात पहिल्यांदा निर्माण झाले. देशातील पहिली कर्जमाफी अंतुले यांनी ७ कोटी रुपयांची केली होती. शिवाय आमदारांना कायमची निवासस्थाने मिळाली. आमदारांचा प्रोटोकॉल आणि स्थान बळकट करण्याचे काम बॅरिस्टर अंतुले यांनी त्यावेळी केले. असे वलयांकित नेतृत्व अंतुले यांच्यारुपाने महाराष्ट्राने पाहिले आहे.

माझ्या वडिलांसोबत अंतुलेसाहेबांकडे जायचो त्यावेळेपासून मुश्ताक अंतुले माझे स्नेही झाले. दीर्घकाळ आमची मैत्री राहिली आहे. बॅरिस्टर अंतुले यांनी कॉंग्रेसला मोठे स्थान मिळवून दिले. इंदिरा गांधींना सहकार्य केले. त्यातून त्यांनी देशात दबदबा निर्माण केला होता. मात्र कॉंग्रेसने त्यांना पुढे जाऊन का मानाचे स्थान दिले नाही हे माहित नाही. कॉंग्रेसने ठरवले असते तर मुश्ताक अंतुले यांचा उपयोग कॉंग्रेस वाढीसाठी केला असता.

महायुतीच्या रुपाने महाराष्ट्रात विकास करण्याची शक्ती उभी राहिली आहे. त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे असे वक्तव्य मुश्ताक अंतुले यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री ना. अजित
दादा पवार , राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भूजवळ , वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ , मदत व पुनर्वसन मंत्रीअनिल पाटील , कृषीमंत्री धनंजय मुंडे महिला व बालविकास मंत्री अदिती ठाकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी जीर्वाल , प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,बाबा सिद्दिकी, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर , मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ , वाय बी त्रिवेदी, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|