नंदुरबार/ प्रतिनिधी:नंदुरबार शहरातील प्रत्येक रस्ता प्रत्येक गल्ली माणसांनी आणि वाहनाने फुलून गेली ईतक्या प्रमाणात आलेल्या समर्थकांच्या साक्षीने आणि महायुती मधील सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, रासप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीच्या तथा भाजपाच्या उमेदवार महा संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आज सोमवार दि.22 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कोणा एखाद्या नेत्याची उमेदवारी दाखल करण्यासाठी इतकी मोठी गर्दी उपस्थित राहिली. एक अर्थाने प्रचंड संख्येत उपस्थित राहून आठही तालुक्यातील गावागावातील समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन घडवले. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा घडवल्या जात असतानाच आज प्रत्यक्ष रॅली प्रसंगी मात्र खासदार डॉ हिना गावित यांच्यासाठी सर्वपक्षीय नेते आवर्जून उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा उमेदवार डॉ. हिना गावित यांची ही रॅली आज सोमवार दि.22 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या निवासस्थानापासून म्हणजे नंदुरबार येथील विरल विहार सोसायटीतील खोडाई माता रोड वरून काढण्यात आली. या रॅलीत आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी, आ. काशीराम पावरा, ज्येष्ठ नेते भूपेश पटेल, आ. राजेश पाडवी, शिंदे गटाच्या आ. मंजुळाताई गावित, विधान परिषद सदस्य आमशा पाडवी, माजी आ. पद्माकर वळवी, माजी आ. शिरीष चौधरी, लोकसभा प्रभारी तुषार रंधे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, महिला मोर्चा अध्यक्ष सविता जयस्वाल, डॉ. विक्रांत मोरे व अन्य मान्यवर रॅलीच्या अग्रभागी होते.
0 Comments