अक्कलकुवा प्रतिनिधी:- प्रकाश नाईक
अक्कलकुवा :- दि. 02 मे 2025 रोजी अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग मुख्य कर्करोग, गर्भाशय कर्करोग व स्तन कर्करोग मोफत तपासणी शिबिर अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदार संघाचे आमदार,आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. यावेळी कर्करोग निदान वाहनचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी डॉ. सुलोचना बागुल, सिनेट सदस्य प्रा. दिनेश खरात, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती पटले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जर्मनसिंग पाडवी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख मगन वसावे, तालुका प्रमुख तुकाराम वळवी, शहर प्रमुख रावेंद्रसिंह चंदेल,, रायसिंग वळवी आमदार आमश्या दादा पाडवी यांचे स्विय सहाय्यक रविंद्र गुरव, सोशल मीडिया प्रमुख हुजेफा भाई बलोच आदी उपस्थित होते. यावेळी कर्करोग निदान मोबाईल वाहनचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.
0 Comments