Header Ads Widget


शहादा : नोबेल अकॅडमीचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न....


प्रतिनिधी : जुनैद अहेमद 

शहादा : जिथे स्वप्ने मोठी असतात, तिथे सुरुवातही भव्य असते, या उक्तीप्रमाणे शहादा शहरात दर्जेदार शिक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले. मोहम्मद कैफ मोहसिन मन्सूरी यांच्या पुढाकारातून शहादा’स नोबेल अकॅडमीचा उद्घाटन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला.

१ फेब्रुवारी २०२६, रविवार रोजी, अमन पार्क, मलोणी, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेला हा उद्घाटन कार्यक्रम अत्यंत सुसंस्कृत, शिस्तबद्ध व भव्य स्वरूपात, मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रिजवान मन्सूरी साहेब होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विश्वासराव पाटील साहब-शहादा ,प्रो. अलहाज सैय्यद लियाकत अली सर ,एडव्होकेट गोविंद साहब, हाजी किस्मत शेख साहब, हाजी रियाज भैय्या अन्सारी साहब ,बासितअली (मुन्ना) कादरी साहब , हाजी अ.रहीम शेख हमिद शेख साहब ,जावेद ज़हीर शेख साहब ,हाजी सुल्तान उस्मान मंसूरी साहब ,हाजी कलीम रमजान पिंजारी सर ,खाटिक महमूद सर ,साजिद उस्मान शेख सर ,डॉ. इमरान खान साहब  ,डॉ. सैय्यद जुबेर साहब  ,सैयद शोऐब सर ,अब्दुल खलीक सर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीने, मार्गदर्शनाने व शुभेच्छांनी हा उद्घाटन सोहळा अधिकच संस्मरणीय ठरला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तौसीफ सर व शोएब सर यांनी अत्यंत प्रभावी व शिस्तबद्ध पद्धतीने करून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, शहादा’स नोबेल अकॅडमी ही केवळ एक कोचिंग अकॅडमी नसून, शहादामध्ये दर्जेदार, उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची एक भव्य सुरुवात आहे. या अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना NEET, JEE, MHT-CET तसेच इतर विविध स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम, शास्त्रशुद्ध व संकल्पनाधिष्ठित तयारी करता येणार आहे.नोबेल अकॅडमीचे स्पष्ट उद्दिष्ट शहादामधून NEET व JEE चे गुणवंत विद्यार्थी घडवणे, तसेच शहरातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे हे आहे. शिस्तबद्ध, निकालाभिमुख शिक्षणपद्धतीवर येथे विशेष भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या अकॅडमीचे नेतृत्व CEO कैफ मन्सूरी साहेब करत असून, कोटा व लातूरसारख्या नामांकित शैक्षणिक केंद्रांतील उच्च दर्जाचे शिक्षण शहाद्यातच उपलब्ध करून देण्याचा त्यांचा संकल्प असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. त्याच अनुषंगाने अकॅडमीतील अध्यापकवर्ग थेट कोटा व लातूर येथून नियुक्त करण्यात आला असून तो अत्यंत अनुभवी व पात्र आहे.

नोबेल अकॅडमीमध्ये NEET (UG), IIT-JEE, MHT-CET तसेच इयत्ता ७ वी ते १० वी फाउंडेशन वर्ग यांसाठी सुसूत्र व शिस्तबद्ध अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. दैनंदिन उपस्थिती अहवाल, मासिक प्रगती अहवाल, पालक-शिक्षक बैठक, दर्जेदार अभ्यास साहित्य, चाचणी मालिका व करिअर मार्गदर्शन या सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणार आहेत.

यावेळी N-SET Scholarship Exam 2026 यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती देण्यात आली. या परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती देण्यात येणार असून, केवळ आर्थिक अडचणींमुळे कोणताही होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा अकॅडमीचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

शहादा’स नोबेल अकॅडमीचा हा प्रवास विद्यार्थी, पालक व संपूर्ण समाजासाठी नवी आशा, नवा विश्वास आणि उज्ज्वल भवितव्याची सुरुवात ठरेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments

|