Header Ads Widget


नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.हिनाताई गावित यांची प्रचारफेरी जल्लोषात संपन्न...

नंदुरबार/प्रतिनिधी : भाजपा महायुतीच्या उमेदवार खासदार डॉ.हिना गावित यांची नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे अत्यंत जल्लोषात प्रचारफेरी काढण्यात आली.विसरवाडी खांडबारा आणि चिंचपाडा परिसरातील शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याबरोबरच स्थानिक रहिवासी सुद्धा शेकडोच्या संख्येने सहभागी झाले. विसरवाडी गावातील जुन्या व नव्या वसाहतींमधील प्रमुख रस्त्यावरून प्रचारफेरी जात असताना गावातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी फुले उधळून व पंचारती ओवाळून स्वागत करण्यात आले. फिर एक बार मोदी सरकार,अबकी बार 400 पार अशा विविध घोषणा देण्यात आल्या. जिल्हा विकासाला आणखी गती मिळावी म्हणून डॉ.हिना गावित यांना तसेच राष्ट्र आणि धर्म याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हत बळकट करायचे असल्याने भारतीय जनता पार्टीला मत द्या असे आवाहन प्रचार फेरीतून करण्यात आले. आमचे मत विकासाला आमचे मत हिनाताईला अशा शब्दात ग्रामस्थांनी आपला निर्धार व्यक्त केला. माजी आमदार शरददादा गावित विसरवाडीतील प्रमुख नेते बकाराम गावित, महिला मोर्चा अध्यक्ष सविता जयस्वाल,विनायक गावित तसेच भारतीय जनता पार्टी,  शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मित्र पक्षांचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|