प्रतिनिधी गणेश सोनवणे : लोणखेडा ता. शहादा येथील शेतकरी कुटुंबातील लघु उद्योजक राकेश शंकर पाटील (वय 47 वर्षे) यांचे दि.20 एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांचे उत्तर कार्य दि.1 मे रोजी होणार आहे. विशेष योगायोग असा की, दि.1 मे रोजीच त्यांचा जन्मदिवस आणि लग्नाचा वाढदिवसही आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,लोणखेडा ता. शहादा येथील शेतकरी कुटुंबातील राकेश शंकर पाटील हे शेती व्यवसाया व्यतिरिक्त वाळू व खडी वाहतुकीचा व्यवसाय करीत असत.ऊस तोडणीसाठीचे हार्वेस्टर मशीनही त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने घेतले होते. विविध प्रकारचे लघु व्यवसाय करणारे स्वर्गीय राकेश पाटील लोणखेडा व परिसरात मनमिळाऊ,शांत,संयमी, सुस्वभावाचे म्हणून परिचित होते. अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे ते अजातशत्रू म्हणूनही ओळखले जात होते. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर धुळे येथे नेत असतांना निधन झाले.त्यांच्या पश्चात आई, पत्नी,भाऊ,वहिनी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर लोणखेडा येथे मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले. विशेष बाब म्हणजे त्यांचे उत्तर कार्य दि.1 मे रोजी असून त्याच दिवशी त्यांचा जन्मदिवस व लग्नाच्या वाढदिवसही आहे. मनमिळाऊ स्वभावाच्या स्वर्गीय राकेश पाटील यांचे आकस्मिक निधन पंचक्रोशीतील जनतेसाठी धक्कादायक घटना असून नियतीचा खेळच न्यारा अशी प्रतिक्रिया परिसरातील जनतेतून व्यक्त होत आहे.
0 Comments