धुळे प्रतिनिधी :- प्रकाश नाईक
राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आनंदखेडे येथे आज दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी पंचायत राज दिन साजरा करण्यात आला. गावातील लोकांना पंचायत राज दिनाचे महत्व समजावे,स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांची जबाबदारी समजून घेण्यासाठी या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रम हा इकोनेट या संविधानावर करणाऱ्या नेटवर्कमार्फत घेण्यात आला.
यावेळी प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे) यांनी पंचायत राज व्यवस्थेचा थोडक्यात इतिहास सांगितला, महात्मा गांधीजी सह अनेक भारतीय विचारवंत व नेत्यांनी ग्रामस्वराज्य, स्वयंपूर्ण गावंची संकल्पना मांडली, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता आणि अधिक मजबूती देण्यासाठी भारतीय संविधानात 73 वी घटना दुरुस्ती 1993 साली करण्यात आली. त्याची अंमलबजावणी 24 एप्रिल 1993 रोजी पासून झाली म्हणून हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्व समजून घेऊन ग्रामस्थांनी गावं विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, वॉर्ड सभा, महिला सभा आणि ग्रामसभा चे नियमित आयोजन करावे, लोकांच्या सहभागातून गावं विकासाचा आराखडा तयार करावा, गावं विकास समिती व विविध विषय समित्या स्थापन करून गाव विकासाच्या कामास गती द्यावी असे प्रतिपादन प्रा. डॉ. निंबाळकर यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन,इकोनेट धुंजन चे धुंजन साथी प्रकाश पाटील यांनी केले होते, या प्रसंगी आनंदखेडे गावाचे ग्राम विस्तार अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या मंजुळाताई पाटील, अंगणवाडीच्या कार्यकर्त्या, महिला बचत गटाच्या सदस्या, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments