नमस्कार मित्रांनो,
आज आपण रेशन अनियमितता/घोटाळ्याशी संबंधित काही बाबी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू.
रेशन घोटाळ्याची व्याप्ती किती असू शकते? असे आपणास विचारल्यास आपण काय सांगाल?
नाही सांगता येणार....म्हणूनच समजून घेऊयात रेशन घोटाळ्याची व्याप्ती किती असू शकते?
समजा A तालुक्यात एकूण 250 स्वस्त धान्य दुकाने/रेशन दुकाने आहेत. या प्रत्येक दुकानात सरासरी 350 कार्ड आहेत. म्हणजे एकूण कार्ड ची संख्या 87500 एवढी आहे.
यापैकी 20 टक्के कार्ड मध्ये अनियमितता होते.
या 20 टक्के कार्ड पैकी प्रत्येक कार्ड मागे एका लाभार्थ्यांचे धान्य हे कमी देण्यात येते
20 टक्के कार्ड ची एकूण संख्या=17500
17500 कार्ड मधून प्रत्येकी एका लाभार्थ्यांचे 5 kg धान्य =87500 kg धान्य गहू+तांदूळ
या 87500 kg धान्याचे बाजार मूल्य सरासरी 16 रुपये किलो प्रमाणे =1,400,000 रुपये
बऱ्याच ठिकाणी पावती न देताच धान्य दिल्या जाते.
समजा A या तालुक्यात एकूण 87500 कार्ड आहेत, यापैकी 80टक्के(70,000) कार्ड धारकांना पावती मिळत नाही. प्रत्येक कार्ड वर सरासरी 4 लाभार्थी आहेत. सरासरी प्रत्येक कार्ड वर 20kg धान्य मिळते.
70,000 कार्ड × 20kg धान्य =1,400,000 kg धान्य
समजा प्रत्येक 1 kg मागे 2 रुपये शिल्लक घेतले तर,
1,400,000 kg धान्य×2 रुपये= 2,800,000 रुपये
रेशन दुकान मध्ये आता 1 kg हरभरा डाळ पण मिळते.
हरभरा डाळ मध्ये किलो मागे 5 रुपया पासुन ते 15 रुपया पर्यंत पैसे शिल्लक घेतले जातात. यामध्ये सरासरी 7 रुपये शिल्लक घेतल्यास 87500 कार्ड चे 612,500 रुपये होतात.
1,400,000+2,800,000+612,500=4,812,500
म्हणजे A या तालुक्यातील रेशन दुकानांमध्ये एकूण 4,812,500 एवढ्या रुपयांची अनियमितता दर महिन्याला किंवा प्रत्येक रेशन वाटपा मध्ये होते.
आपण असे घोटाळे थांबऊ शकत नाहीत का?
हो, आपण असे घोटाळे थांबऊ शकतो परंतु यामध्ये सर्व जागरूक नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित आहे.
सर्व नागरिकांनी गावातील स्वस्त धान्य दुकाने यांची सामाजिक अंकेक्षण याची प्रत मागितली तर अश्या अनियमितता कमी होतील.
आपण माहिती अधिकार कायद्याचा वापर करून सामाजिक अंकेक्षण याची प्रत मिळऊ शकतात.
*स्वस्त धान्य दुकान यांची सामाजिक अंकेक्षनाची प्रत मिळवा. सामाजिक अंकेक्षण (Social Audit) चे लाभ.
१) रेशनकार्डधारकांना व गावकर्यांना पुरवठा विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती उपलब्ध होईल.
२) रेशनकार्डधारकांना विविध योजनेच्या धान्याचा दर व परिमाण याची माहिती उपलब्ध होईल.
३) रेशनकार्डधारकांना गावातील योजनानिहाय शिधापत्रिका धारकांची संख्या व यादी याबाबतची माहिती उपलब्ध होईल.
४) रेशनकार्डधारकांना शिधावाटप दुकानाच्या वेळेबाबत माहिती उपलब्ध होईल.
५) रेशनकार्डधारकांना प्राप्त झालेले धान्य व विक्री केलेल्या धान्याबाबत माहिती उपलब्ध होईल.
६) शिधावाटप दुकानांच्या धान्य वितरणात पारदर्शकता निर्माण होईल.
७) शिधावाटप दुकानातून होणारा धान्याचा काळाबाजार व गैरव्यवहार रोखण्यास मदत होईल.
८) रेशनकार्डधारकांमध्ये पुरवठा विभागाबाबत जागृती होऊन सकारात्मक भावना निर्माण होईल व रेशनकार्डधारकांचा पुरवठा विभागाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल.
सामाजिक अंकेक्षण याचे फायदे व माहिती अधिकार अर्ज नमुने मिळवण्यासाठी येथे भेट द्या..
0 Comments