Header Ads Widget


जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावी प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन ..


 



नंदुरबार! Nandurbar/LivenationNews





 जवाहर नवोदय विद्यालय, श्रावणी नंदुरबार-2 मध्ये 2023-2024 शैक्षणिक वर्षांसाठी इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षेसाठी 31 जानेवारी,2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.एस.पातोडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

जवाहर नवोदय विद्यालय,श्रावणी, नंदुरबार- 2 मध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी हा जिल्ह्यातील नवापूर व नंदुरबार तालुक्यातील शासनमान्य शाळेत इयत्ता पाचवीत 2022-2023 या शैक्षणिक वर्षांत शिकत असावा. विद्यार्थ्यांचा जन्म 1 मे 2011 पूर्वी झालेला असावा.30 एप्रिल 2013 नंतर झालेला नसावा. सदर अट सर्वांसाठी लागू असेल. सन 2020-2021, 2021-2022,2022-2023 यावर्षांत विद्यार्थ्यांने तिसरी, चौथी व पाचवीत अनुक्रमे खंड न पाडता उत्तीर्ण असावा. अनुसूचित जाती,जमाती आणि मुली, दिव्यांग संवर्गासाठी व इतर मागासवर्गासाठी जागा राखीव असतील. तृतीयपंथीय उमेदवारसुध्दा या निवड चाचणीसाठी अर्ज करु शकतात. अर्ज सादर करतांना आधार कार्ड, मुख्याध्यापकाचे पत्र, रहिवाशी दाखला, फोटो व सही आवश्यक आहे.

जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेश परीक्षा शनिवार दि.29 एप्रिल,2023 रोजी  सकाळी 11.30 वाजता होईल. माहिती पत्रक व प्रवेश अर्जासाठी www.navodaya.gov.in/nvs/en/Home1 तसेच https://cbseitms.nic.in/https://cbseitms.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर करावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.एस.पातोडे यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments

|