Header Ads Widget


महाराष्ट्र विविध विधायक समितीच्या नॅशनल गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार येथे शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात


नंदूरबार (शेख फहीम)

नंदुरबार येथील महाराष्ट्र विविध विधायक कार्य समिती संचालित, नॅशनल गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय  नंदुरबार येथे शाळा स्तरावर विज्ञान प्रदर्शन घेण्यात आला.


विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण निर्माण व्हावा व त्यांच्या कौशल्य तसेच सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी  महाराष्ट्र विविध विधायक कार्य समिती संचालित नॅशनल गर्ल्स हायस्कूल हि शाळा नेहमी प्रयत्नशील असते. विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन  शाळेचे विज्ञान शिक्षक, क़ाज़ी नवीद मुहम्मद सलीम, विज्ञान शिक्षिका क़ाज़ी निकहत मॅडम, गणित शिक्षक खान अब्दुल्ला बिन अशरफ़, कला .शिक्षिका खान हिना मॅडम भूगोल शिक्षक खान फहीम खान यांनी केले.


यात वाहतूक,दळणवळण, संगणकीय विचार , गणितीय मॉडेल, पर्यावरण, कचरा  व्यवस्थापन आदी विषयांवर ६५ मॉडेल बनविण्यात आले होते. महाराष्ट्र विविध विधायक कार्य समितीचे अध्यक्ष अल्हाज इनामदार ज़काल्लाह हसनउल्लाह साहेब ,संस्थेचे पदाधिकारी व  शाळेचे माजी प्राचार्य अल्हाज मुहम्मद हनीफ सर, अल्हाज खान लियाकत, अल्हाज अशरफ़ खान सर, अल्हाज अब्दुल लतीफ़ मनियार साहेब, मोहसीन सर, तसेच पालक वर्गानी विज्ञान प्रदर्शनाचे  कौतुक केले.


परीक्षक म्हणून नगर परिषद उर्दु शाळा क्रमांक २,११,१४ चे मुख्याध्यापक  कागज़ी ज़ुल्मीनन शेख नाज़मा मॅडम, मंसूरी सुमैया मॅडम, नॅशनल उर्दू प्राथमिक चे मुख्याध्यापक शेख वासीफोद्दीन, सिटी हाइस्कूल चे निवृत्त विज्ञान शिक्षक अल्हाज फिरोज़ खान सर,यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन विज्ञान शिक्षक क़ाज़ी नवीद सर यांनी केले. अहवाल वाचन मुख्याध्यापक शेख अल्ताफ  यांनी केले. आभार शाळेचे पर्यवेक्षक कुरेशी अब्दुल रहीम सर यांनी मानले.  विज्ञान  शिक्षिका क़ाज़ी निकहत मॅडम,कला शिक्षिका हिना मॅडम, भूगोल शिक्षक खान फहीम सर विज्ञान शिक्षक क़ाज़ी नवीद सर, खान अब्दुल्ला बिन अशरफ़ गणित शिक्षक इनामदार अब्दुर्रब सर, शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अल्हाज अल्ताफ़ रज़ी सर,हाजी फ़ारुक सर, सैय्यद ज़ैद सर, प्राध्यापक पठान सोहेल सर, खाटीक नीलोफर मॅडम,क्रीड़ा शिक्षक शेख असलम सर, शेख मोहसिन सर,इनामदार नदीम सर, आरिफ़ भैय्या, नाज़िम भैय्या या सर्वांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|