धुळे प्रतिनिधी प्रकाश नाईक
धुळे :- समता शिक्षण संस्था पुणे,संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे,धुळे आणि नगर राज बिल समर्थन मंच देवपूर,धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९/डिसेंबर २०२४ गुरुवार रोजी प्रभाग क्रमांक ३ वीट भट्टी परिसर देवपूर धुळे येथे, दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला. प्रथमतः आलेल्या सर्व डॉक्टरांचे आणि उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, आणि शिबिराला सुरुवात करण्यात आली. या शिबिरात ए. सी. पी. एम.डेंटल कॉलेज मोराणे, धुळे येथील डॉक्टरांनी येऊन शिबिराच्या माध्यमातून स्थानिक लोकांच्या दातांची तपासणी केली. दातांची तपासणी करत असतांना डॉक्टरांनी नागरिकांना दातांची काळजी कशा प्रकारे घ्यावी,काही इजा असल्यास तत्काळ त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे अशा काही सूचना दिल्या. या दंत तपासणी शिबिराला स्थानिक लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यामध्ये वृध्द,महिला,बालक सर्वांनी आपली तपासणी करून घेतली. त्यात एकूण
८४ लोकांची दंत तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. डॉ.गोपाळ निंबाळकर, नगर राज बिल समर्थन मंच,धुळे समन्वयक रामदास जगताप, स्थानिक नागरिक उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी अभय पाटील,जितेंद्र कामडे,अर्जुन उफाडे,नयना बैसाणे,संजीवनी सोनवणे,सीमा जगताप इत्यादी प्रशिक्षणार्थिंनी कार्यक्रम योग्य प्रकारे पार पडला पाहिजे त्यासाठी परिश्रम घेतले.
0 Comments