Header Ads Widget


नंदुरबार जिल्हास्थरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्द्यालयाचे यश


प्रतिनिधी शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा २०२४ नंदुरबार येथील गजमल तुळशीराम पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात पार पडली. स्पर्धेत महाविद्यालयांतून एकुण २२ विद्यार्थांनी १७ संशोधन विषयात  सहभाग नोंदविला होता. त्यातील ०६ संशोधन विषय ०७ विदयार्थीची निवड झाली आहे. त्यात प्यूअर सायन्ससेस या थिममध्ये मेघा भाऊसाहेब सोनवणे (युजी- पदार्थ विज्ञान) व हुम्यानीटीज या थिममध्ये राजू वळवी (युजी- हिंदी), करण रावताळे व सचिन पावरा (युजी - अर्थेशास्त्र), अग्रीकल्चर या थिममध्ये योगेश मानेज (युजी - भूगोलशास्त्र), निलेश रवींद्र कोळी (पीपीजी- अर्थेशास्त्र) व हितेश ठाकरे (पीपीजी- अर्थेशास्त्र) या सर्व स्पर्धकांचे चार वेगवेगळ्या स्थरातून विद्यापीठस्थरीय फेज-२ सादरीकरणकरीता निवड झालेली आहे. निवड झालेले सर्वे स्पर्धेक दि.१९ डिसेंबर २०२४ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे सादरीकरण करतील.

या यशस्वी विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रा. डॉ. बी. वाय. बागुल, प्रा. डॉ. ए. सी. चव्हाण, प्रा. एस. के. पाटील, प्रा. डॉ. डी. वाय. पाटील व प्रा. डॉ. एम. जे. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयीन अविष्कारचे समन्वयक प्रा. डॉ. बी. वाय. बागुल व प्रा. डॉ. आर. डी. पाटील यांनी काम पाहिले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव मा. भैय्यासाहेब प्रा. श्री. संजयजी जाधव, सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सचिव मा. सौ. वर्षाताईसाहेब जाधव, सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे प्रशासकीय प्रमुख मा. प्रा. डॉ. हिमांशुभाऊ जाधव, समन्वयक मा. श्री. संजयजी राजपूत सर, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. डी. डी. राठोड यांनी विद्यार्थांचे कौतुककरून सत्कार करण्यात आला व विद्यापीठस्थरीय स्पर्धकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments

|