Header Ads Widget


श्री.स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नामजप यज्ञ शब्दाचे आयोजन...


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा शहरातील वृंदावन नगर, दत्त मंदिर, व मामाचे मोहिदे येथिल श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दिनांक 30 एप्रिल ते सहा मे पर्यंत स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नामजप यज्ञ शब्दाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्था चे नाम मात्र जीर्ण देह सोडण्याची तिथी व त्या दिवसाच्या आठवण म्हणून सात दिवसाच्या सप्ताह सर्व दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रावर विशिष्ट पद्धतीने यज्ञ याग, होमहवन , जप तप, ध्यानधारणा इत्यादी उपासना व प्रात्यक्षिके केली जात असतात. तसेच या सप्ताहत प्रहर सेवा सात दिवस 24 तास अखंड सेवा सुरू राहते. त्यात वीना वादन, श्री स्वामी समर्थ मंत्र जप, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचन होत असते. सप्ताहात प्राधानिक स्वरूपात भागवत पारायण, हवनयुक्त गुरुचरित्र पारायण, श्री दुर्गा सप्तशती पाठ, श्री स्वामी चरित्र सारामृत, श्री नवनाथ पारायण, मल्हारी सप्तशती व अनेक देवदेवतांची हवनद्वारे प्रत्यक्ष सेवा करण्यात येत असते. दिनांक 29 एप्रिल रोजी ग्रामदेवता सन्मान, मंडळ मांडणी, अग्निपरीक्षा दिनांक 30 रोजी मंडळ स्थापना, स्थापित देवता हवन, नित्य स्वाहाकार, दिनांक 1 मे रोजी नित्य स्वाहाकार, गणेश याग , मनोबोध याग, दिनांक दोन रोजी नित्य स्वाहाकार, स्वामी याग, दिनांक तीन रोजी नित्य स्वाहाकार ,चंडीयाग, दिनांक चार रोजी नित्य स्वाहाकार, गीताई याग , दिनांक पाच रोजी नित्य स्वाहाकार, रुद्र याग, मल्हारी याग व दिनांक सहा मे रोजी नित्य स्वाहाकार, बली पूर्ण आहूती, श्री सत्यदत्त पूजन करून श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सांगता समारोह व नंतर महाआरती व महाप्रसाद सप्ताहाची सांगता होणार आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी शहरातील वृंदावन नगर दत्त मंदिर व मामाचे मोहिदे येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सेवेच्या लाभ घ्यावा व आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्र मार्फत करण्यात आले आहे. शब्दाचे संपूर्णपणे तयारी तिघा केंद्रात करण्यात आली असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी या शब्दाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

|