Header Ads Widget


पहिलीच्या नवीन विद्यार्थ्यांसाठी शाळेतर्फे विद्यार्थी आणि पालक मेळावा आयोजित ...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा तालुक्यातील गणोर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शैक्षणिक सत्रात सन 2024-25 च्या पहिलीच्या नवीन विद्यार्थ्यांसाठी शाळेतर्फे विद्यार्थी आणि पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी शाळेतील विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल रावताळे यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले.यावेळी शाळेचे शिक्षक प्रकाश जाधव व गुलाब पावरा यांनी इयत्ता पहिलीच्या नवीन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले या मेळाव्या दरम्यान नवीन विद्यार्थ्यांचे वजन, उंची घेउन वर्गातील खेळणी अभ्यास उपयुक्त फलक संख्या वाचन इत्यादीची माहिती देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक श्री.जगदाळे यांनी शाळेतील पहिले पाऊल नावाचे पुस्तक सर्व विद्यार्थ्यांना शाळेपूर्व अभ्यासपूर्ण तयारी करण्यासाठी दिले व त्या पुस्तकाचे संपूर्ण माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यात आली. यावेळी मेळाव्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल रवताळे, उपाध्यक्ष वीणा शेल्टे, लक्ष्मण तडवी, मुख्याध्यापक जगदाळे, मनोहर निमजे, चेतन पाटील, प्रकाश जाधव, गुलाब पावरा, भोमराज जाधव, दामू वळवी, अंगणवाडी सेविका अनिता वळवी, योगिता भामरे, आशा ब्राह्मणे, कलावंती निकुंम, अंजली पटले, संगीता निकुंम व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|