Header Ads Widget


उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर;नंदुरबार जिल्हयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा समावेश..

 

नंदूरबार/प्रतिनिधी:महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनीय/प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक, पोलीस पदक, पोलीस शौर्य पदक व पोलीस महासंचालकाचे बोधचिन्ह/सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्राने सन्मानित करण्यात येते. त्या अनुषंगाने सन 2023 या वर्षाकरीता उल्लेखनीय सेवेबद्दल महाराष्ट्रातील तब्बल 800 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस महासंचालक यांचे पदक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे. यामध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस अधिकारी व पाच पोलीस अंमलदारांचा समावेश आहे.


पोलीस महासंचालक पदक जाहीर झालेल्यांमध्ये 1)पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार, 2)पो.हवा/88 नरेश ओंकार गुरव नेमणुक नंदुरबार तालुका पोलीस ठाणे, 3)पो. हवा/233 भिमसिंग सत्तार ठाकरे, नेमणुक म्हसावद पोलीस ठाणे, 4)पो. नाईक /1147 मोहन पांडुरंग ढमढेरे नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार,5) पो. नाईक /955 संदिप संतोष लांडगे नेमणुक शहादा पोलीस ठाणे,6) महिला पोशि/1356 निंबाबाई रामा वाघमोडे नेमणुक नंदुरबार शहर पोलीस ठाणे यांचा समावेश आहे.

दिनांक 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिनी पोलीस मुख्यालय नंदुरबार येथे होणाऱ्या पथसंचालनावेळी वरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर पदकप्राप्त अधिकारी व अंमलदार यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments

|