Header Ads Widget


खोंडामळी कोपर्ली मार्गे नंदुरबार ते चोपडा बस सुरू | आगार व्यस्थापक यांचे आव्हान

नंदुरबार प्रतिनिधी  : सर्व प्रवाशी बांधवांना नंदुरबार आगार कडून आनंदाची बातमी कळवण्यात येत आहे की, शिरपूर, चोपडा जाण्यासाठी प्रवाशी बांधवांची होणारी अडचण लक्षात घेऊन खोंडामळी कोपर्ली मार्गे नंदुरबार ते चोपडा ही बस चालू करण्यात येत आहे. सदर बस नंदुरबार वरून सकाळी ७ वाजता सुटून कोलदा, भागसरी, खोंडामळी, विखरण, शिंद्धगव्हाण, काकदे, जुनमोहिदा, कोपर्ली, मांजरे, बाह्याने, निमगुल, सारंगखेडा, कळबु, कुकावल, वळाई, तराडी, भटाणे, वरूळ, अर्थे, भामपूर फाटा, शिरपूर, बभळाज, नागेश्वर मंदिर, अनेर फाटा, हतेड, चोपडा अशी जाईल व चोपडा ते नंदुरबार साधारण ११:३० वाजता परत निघेल तरी सर्व प्रवाशी बांधवांनी सदर गाडीचा उपयोग करून आपली होणारी अडचण दूर करावी हीच नंदुरबार आगार, रा.प.म महामंडळ यांच्या कडून आपणास नम्र विनंती.

आगार व्यवस्थापक

नंदुरबार आगार - राज्य परिवहन महामंडळ

Post a Comment

0 Comments

Today is Wednesday, April 9. | 10:06:58 AM