Header Ads Widget


खेतिया पोलीस स्टेशन व म्हसावद पोलीस स्टेशन तसेच महसूल विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक...

 






नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेसाठी महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमा वरती भागातील तालुक्यातील महसूल व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सामूहिक बैठक खेतिया येथील नगरपालिका सभागृहात झाली.नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीदत्त बडवानी जिल्हाधिकारी डॉ. राहुल फटिंग जिल्हा पोलीस अधीक्षक पुनीत गेहलोद यांच्या सूचनेनुसार मध्य प्रदेशातील खेतिया पोलीस स्टेशन व शहादा तसेच म्हसावद पोलीस स्टेशन तसेच महसूल विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक सीमा बॉर्डर बैठक झाली.बैठकीला शहादा येथील तहसीलदार दीपक गिरासे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार शहादा येथील पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत म्हसावद पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे पानसेमल मध्य प्रदेश तहसीलदार सुनील सिसोदिया खेतिया पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकसुनिता मंडलोई सह अन्य अधिकारी उपस्थित होते.बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालणे.सीमा नाकाबंदी काळजीपूर्वक करून वाहनांची तपासणी करणे गुन्हेगारीवर बचत बसून फरार आरोपींच्या शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी पोलीस कारवाईचे संयुक्त ऑपरेशन राबवणेसह अन्य विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली.उपस्थितांचे आभार खेतिया पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिता मंडलोई व मसावद तालुका शहादा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

|