नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे:पुरुषोत्तम नगर तालुका शहादा येथे दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता नव्याने बांधण्यात आलेल्या विठ्ठल-रुक्माई मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गावातून सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर मुर्त्यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.शोभा यात्रेत अनेक मान्यवर व शेकडो भाविक सहभागी झाले होते.शोभा यात्रेची सुरुवात नीलकंठेश्वर महादेव मंदिरापासून सुरुवात करण्यात आली.शोभा यात्रेच्या अग्रस्थानी विविध वेशभूषित डोक्यावर कलश घेतलेल्या लहान मुली नंतर विविध रंगीबेरंगी साड्या परिधान करून व डोक्याला फेटे बांधून शेकडो महिला तसेच ग्रामस्थ सहभागी झालेले होती.ठिकठिकाणी पुष्पष्टी करण्यात आली.शोभा यात्रेच्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या.तर ट्रॅक्टर ट्रॉलीला फुलांनी सजविण्यात आलेले होते.सजवलेल्या ट्रॉलीत विठ्ठल व रुक्माई तसेच महादेवाची शिवलिंगाची मूर्ती ठेवण्यात आलेली होती.शोभायात्रा पूर्ण गावात ठेवण्यात आली व शेवटी नव्याने बांधण्यात आलेल्या विठ्ठल मंदिरापर्यंत आणण्यात आली.शोभा यात्रेत वेदमूर्ती द्वारकेश महाराज नागाई शुगर लिमिटेड चे अधिकारी सरपंच कोकिळा पाटील उपसरपंच जयश्री पाटील सह प्रतिष्ठित मान्यवर सहभागी झालेले होते.शोभायात्रे नंतर धार्मिक पूजा विधी करण्यात आली त्यात गणेश पूजन अग्निस्थापन पूजा करण्यात आली.या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments