Header Ads Widget


सेवा भारती समितीतर्फे शहाद्यात रुग्णउपयोगी साहित्य सेवा केंद्राचे शुभारंभ...


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:रुग्णांची सेवा ही सर्वोत्तम सेवा आहे.रुग्ण उपयोगी साहित्य सगळ्यांना उपयोगी ठरेल. सेवा भारती साहित्य सेवा केंद्र सुरू करण्याच्या शहादा येथील समितीने केला हे कौतुकास्पद असून सेवा भारतीच्या नावातच सेवा असल्याने निश्चित उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन धुळे येथील सेवा भारती विभाग संयोजक डॉ.कुणाल पाटील केले.शहादा येथे पतंजली नगर मधे दिनांक २८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सेवा भारती नंदुरबार शहादा शाखा समितीतर्फे रुग्णउपयोगी साहित्य सेवा केंद्राच्या शुभारंभ करण्यात आला त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त अभियंता जितेंद्र पाटील उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डॉ.बी.डी.पाटील होते.प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहादा तालुका संघचालक डॉक्टर हेमंत सोनी डॉक्टर वसंत एन.पाटील डॉ.हेमंत नेमाडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते अजय शर्मा संकल्प ग्रुपचे अध्यक्ष पिनाकिन पटेल लक्ष्मीकांत अग्रवाल डॉक्टर राकेश पाटील सह शहरातील अन्य नामांकित डॉक्टर विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. जितेंद्र पाटील व डॉ. बी.डी.पाटील यांच्या हस्ते साहित्य सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.सेवानिवृत्त अभियंता जितेंद्र पाटील यांनी त्यांचे वडील स्वर्गीय उद्धव श्याम पाटील यांचे स्मरणार्थ सर्व रुग्णुपयोगी साहित्य भेट म्हणून दिली आहे.हे सर्व साहित्य शहादा शहर सह परिसरातील रुग्णांना उपयोगी ठरणार आहे.पुढे बोलतांना कुणाल पाटील यांनी शहादा येथील साहित्य सेवा केंद्र संचालन समितीचे सर्व सदस्य निश्चित चांगली सेवा देतील.चांगला संकल्प केला आहे असे सांगून शुभेच्छा दिल्या.रुग्णुपयोगी साहित्य सेवा केंद्र विविध रंगीबेरंगी फुगे लावून सुशोभित करण्यात आलेले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन पत्की यांनी केले.रुग्णुपयोगी साहित्यामध्ये १० बेड व्हील चेअर अपंग रुग्णांसाठी विविध साहित्य ऑक्सीजन यंत्र सह इतर अत्यावश्यक साहित्याच्या समावेश आहे.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सेवा भारती रुग्णुपयोगी साहित्य केंद्र संचालन समितीचे सर्व सदस्यांनी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले.

Post a Comment

0 Comments

|