साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी(दा.) येथील ग्रामदैवत येडू माय मातेच्या यात्रोत्सवाला दि.२९ एप्रिल सोमवारी रोजी प्रारंभ झाला. ग्राम सुधार मंडळाच्या वतीने सकाळी आठ वाजेच्या सुमारास येडु माय मातेची आरती व पूजाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील नागरीक श्री.अशोक दयाराम साळुंके व त्यांच्या धर्मपत्नी विमलबाई अशोक साळूंके यांना प्रथम आरती करण्याचा मान देण्यात आला. मागील तीन वर्षापासून कोरोनाचे संकट लक्षात घेऊन गावात यात्रा उत्साहात पार पडली नव्हती परंतु आता कोरोनाचे संकट कमी झाले असून हे लक्षात घेऊन शेवाळी येथील यात्रा यावर्षी प्रचंड उत्साहात पार पडली, यात्रेनिमित्त विविध प्रकारच्या खेळण्यांची दुकाने ,पाळणे, कटलरी वस्तू व संसारोपयोगी वस्तूसह हॉटेल्स व पूजेचे साहित्य,टरबूज-डांगर, शीतपे य विक्रेत्यांची दुकाने येथे थाटले होते, यात्रेत बाहेर गावाहून आलेल्या दुकानदार व्यावसायिक यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर ची व्यवस्था करण्यात आली होती. बाहेरगावी वास्तव्यास असलेले अगदी धुळे,नाशिक, पुणे, मुंबई, सुरत येथील स्थानिक नागरिकांनी यात्रेनिमित्त गावी हजेरी लावली होती त्यामुळे मातेच्या दर्शनासाठी दिवसभर गर्दी होती यात्रेनिमित्त क्रांतीभाऊ सोनवणे जळगांवकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन भद्रावती नदीकाठी करण्यात आले होते, लोकनाट्य तमाशा बघण्यासाठी आवड असणारे नागरिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती ,यात्रेत संध्याकाळी तगतरावाची मिरवणूक काढण्यात आली .यात्रा उत्सवासाठी गावातील आजी माजी सरपंच ,उपसरपंच व व तसेच सर्व सदस्य ,ग्राम सुधार मंडळ ,विविध विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन व संचालक मंडळ, भजनी मंडळ, ग्राम विकास अधिकारी, पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच ग्रामस्थांसह तरुणांनी संयोजन केले होते यावेळी शेवाळी(दा )गांव व परिसरातील हजारोंच्या संख्येने येडूमाय मातेच्या यात्रेला भाविकांनी व तसेच नागरिकांनी हजेरी लावली होती.
श्री.सुरेश साळूंके(ग्राम सुधार मंडळ सचिव):-
शेवाळी(दा.) येथील ग्रामदैवत येडू माय मातेच्या यात्रेत कुठलीही अनुचित घटना घडणार नाही याची दक्षता ग्राम सुधार मंडळाने घेतली होती, यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी गावातील नागरिकांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले, सर्वांचे मनापासून धन्यवाद.
0 Comments