Header Ads Widget


पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न ...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नितीन जाधव, माजी विद्यार्थी डॉ सुनिल पांडे, प्राचार्य डॉ. एस. पी. पवार, आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित डॉ नितीन जाधव यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय हे एक ऊर्जा देणारे महाविद्यालय असून या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी हे आज विविध ठिकाणी वरिष्ठ व उच्च पदावर विराजमान असून कार्य करीत आहेत. विद्यार्थी कितीही मोठे झाले तरी आपली शाळा -महाविद्यालयातील आठवणी नेहमी मनात घर करून असतात. जीवनात अनेक चढ - उतार येत असतात त्यात खचून न जाता अजून जोमाने कार्य करायला पाहिजे. औषध निर्माणशास्त्र विभागात विद्यार्थ्यांना खूप चांगले भविष्य असून विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून आपले भविष्य उज्वल बनवू शकतात. जन्माची चाहूल लागल्यापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्यात आवश्यक घटकांपैकी एक म्हणजे औषध हा घटक आहे. रुग्णांना जीवनदान मिळण्यात मोठा वाटा हा औषधांचा असतो. वैद्यकशास्त्र हे रोगाचे निदान करायला शिकवते तर औषधनिर्माणशास्त्र त्या रोगावर कोणते औषध वापराव, ते कसे तयार करावे हे शिकवते. प्रत्येकाला जीवनात कुठल्या ना कुठल्या आजारा करता किंवा रोगाकरिता औषध घ्यावे लागते, म्हणूनच औषध निर्माणशास्त्र हे वैद्यकशास्त्र व रुग्ण यामधील महत्त्वाचा दुवा आहे. नितीन जाधव हे शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून ते सध्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या आरोग्य सेवा महासंचालनालय, अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) च्या चेन्नई येथील समुद्री बंदर कार्यालयात 'भारताचे सहाय्यक औषध नियंत्रक' म्हणून नियुक्त आहेत. त्यांनी वर्ष २००० मध्ये आपले बी.फार्मसी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. डॉ सुनिल पांडे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, कंपनीमध्ये कार्य करतांना विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी जेणे करून कंपनीव स्वतःचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. कंपनीने दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्णतः करून उत्कृष्ट कार्य करावे. कंपनीमध्ये कशा पद्धतीने कार्य केले जाते याविषयी सखोल माहिती सांगितली. औषधनिर्माण क्षेत्रात प्रात्यक्षिकांना जास्त महत्त्व असते कारण की प्रत्यक्षात उपकरणे हाताळणे व विविध प्रकारचे औषधी बनवणे आणि त्यांचे मूल्यमापन करणे तसेच प्रात्यक्षिक केल्याने विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढत असते आणि त्यांना त्याबाबतीचे सखोल ज्ञान मिळत असते. म्हणून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात आपले ध्येय ठरवले तर ते गाठू शकतात. डॉ सुनिल पांडे हे शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून ते सध्या आर अँड डी, एन डी डी एस भारत सिरम अँड वॅक्सिनेशन लिमिटेड पुणे चे सहाय्यक उपाध्यक्ष असून त्यांनी वर्ष २००३ मध्ये औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथून आपले बी.फार्मसी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. यावेळी २०० पेक्षा जास्त माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे आजी - माजी विद्यार्थ्यांचा संवाद होऊन एक नवीन दिशा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ सुनीला पाटील यांनी केले तर आभार प्रा.डॉ. जवेश पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.


    

Post a Comment

0 Comments

|