Header Ads Widget


श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला सुरुवात...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील जुना मोहिदा रस्त्यावरील श्री स्वामी समर्थ केंद्रात दिनांक ३० एप्रिल सकाळपासून श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला सुरुवात करण्यात आली असून शेकडो सेवेकरी सेवा देण्यासाठी व दर्शनासाठी गर्दी केली होती.दिनांक ३० एप्रिल ते ६ मे पर्यंत सप्ताहाचे आयोजन केलेले आहे.सकाळी मंडळ स्थापना स्थापत्य देवता हवन व पाठवाचन घेण्यात आले.सामूहिक पाठ वाचन करतांना स्वामी समर्थ केंद्रात शेकडो पुरुष व महिला सेवेकरी सहभाग घेतलेला होता.अक्षरशः सकाळपासून सेवेकरींनी दर्शनासाठी गर्दी केलेली होती.उशिरापर्यंत सेवेकरी येतच होते.१ मे रोजी गणेश याग मनोबोध याग नित्य स्वाहाकार २ मे रोजी श्री स्वामी याग व स्वाहाकार ३ मे रोजी श्री चंडीयाग ४ मे रोजीश्री गीताई याग ५ मे रोजीश्री रुद्र याग श्री मल्हार या व ६ मे रोजी पूर्णा होती दत्त पूजन व समारोप होईल.सप्ताहात सामूहिक गुरुचरित्र वाचन रोज सकाळी ८वाजता सुरू होईल.प्रहरे सेवा महिला सेवेकरी सकाळी ८ ती रात्री ८ व पुरुष सेवेकरी रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत राहील.तरी सेवेकरींनी या सप्ताहाच्या लाभ घ्यावा असे आव्हान शहादा येथील श्री स्वामी समर्थ केंद्र समितीचे पदाधिकारी यांनी केले आहे.सप्ताह निमित्त स्वामी समर्थ केंद्राच्या बाहेर मोठा मंडप लावण्यात आलेला आहे.

Post a Comment

0 Comments

|