Header Ads Widget


सातत्याने उष्णतेच्या पारा ४० डिग्री सेल्सिअसच्या वरती असल्याने शेतकरी संकटात...


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे:शहादा शहर सह परिसरात गेल्या दहा दिवसापासून सातत्याने उष्णतेच्या पारा ४० डिग्री सेल्सिअसच्या वरती असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.तीव्र उष्णतेच्या परिणाम नवीन लागवड केलेल्या पपई व केळी पिकाच्या राेपांवर होत असल्याने त्यांना वाचविण्यासाठी वेगवेगळे उपाय शेतकरी करीत आहेत.पपई व केळीच्या हंगाम जवळजवळ संपलेला आहे.शेतकरी आता शेती मशागतीची कामे सुरू केली आहेत.उन्हाळी कापूस लागवड करण्याची लगबग सुरू आहे.त्यातच पपईचे रोपे व केळीचे खोड लागवड करीत आहेत.बऱ्याच शेतांमध्ये पपईची रोपे डाेलायला लागली आहेत.मात्र सध्या त्या रोपांना उन्हापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिकच्या कागदचा उपयोग केला जात आहे.पाण्याच्या अधून मधून शिडकाव केला जातो.उन्हापासून बचाव करण्यासाठी प्राधान्य देत आहेत.एका बाजूला जमिनीत पाण्याची पातळी खोलवर गेली असतांना पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.साधारणता प्रत्येक पपईच्या रोपाची किंमत १५ ते १६ रुपये आहे.सोलापूर भागातून काही शेतकरी राेपे मागतात.शहादा तालुक्यात देखील आता मोठ्या प्रमाणे रोपे उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना सोय झाली आहे.केळी पीक लागवडीसाठी तालुक्यातच शेतकऱ्यांकडे केळीचे खोड मिळत आहेत.मात्र उष्णतेमुळे रोपांची कोवळी पाने पिवळी पडत आहेत.काही पाने गळून जातात म्हणून मे महिना शेतकऱ्यांच्या दृष्टीने कठीण असतो.पूर्ण मे महिना रूपांना वाचवण्यासाठी उपाययोजना करावी लागते.नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक पपई व केळीचे उत्पन्न घेतले जाते. दिवसभर उष्ण वारे वाहतात.उष्ण वाऱ्यांच्या परिणाम पपई व केळी पिकांच्या पानावर होत आहे.राेपांना जास्तीत जास्त पाण्याच्या ओलावा ठेवण्याच्या प्रयत्न केला जात आहे.शेतकरी उन्हापासून रोपांना वाचविण्यासाठी उपाय करीत आहेत.काही रोपे जळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते-ईश्वर माळी-पपई उत्पादक शेतकरी जयनगर तालुका शहादा.

Post a Comment

0 Comments

|