नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे : म्हसावद पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे चिखली फाटा येथे लावलेल्या नाकाबंदीत पांढऱ्या रंगाचा बोरेलो गाडीसह त्यात भरलेली देशी दारु असा एकूण पाच लाख ३८ हजार ७३६ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सोमवारी पहाटेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत चालकाविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्या आदेशाने व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाने (ता.२८)च्या रात्री ११ वाजता ते (ता.२९) च्या पहाटे पाच वाजे दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र ऑल आऊट स्कीम राबण्यात आली होती.त्या अनुषंगाने चिखली फाटा म्हसावद या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती सदर नाकाबंदीच्या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो (क्र.एम. एच.०४,जीएम ५३९७) मध्ये चालक नामे वंशा जंगल्या नाईक (वय ३६) रा. घाटली ता. धडगाव हा आपल्या ताब्यातील वाहनात अवैध दारूची चोरटी वाहतूक करीत आहे.अशी गुप्त माहिती दाराकडून जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस.यांना मिळाल्याने त्यांनी म्हसावद पोलीस ठाण्याचे प्रभारी राजन मोरे यांना कळवून तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने नाकाबंदीच्या ठिकाणी दोन टीम मध्ये सापळा रचण्यात आला रात्री १२:४५ वाजेच्या सुमारास वाहन चालक हा त्याच्या ताब्यातील बोलेरो गाडीत एक लाख ३८ हजार ७३६ रुपये किंमतीचा देशी दारू (संत्रा व टॅंगो ) चे ५६ बॉक्स. प्रत्येक बॉक्समध्ये १८० मिली. चे ४८ क्वार्टर. एकूण २६८८ देशी दारूच्या कॉटर व पाच लाख ३८ हजार ७३६ रुपयेकिमतीचे बोलेरो वाहनसह मिळून आला.यावेळीचालकाविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तपास पो. हे. कॉ.भीमसिंग ठाकरे हे करीत आहेत. सदर छापा कारवाई सपोनी राजन मोरे, पोलीस नाईक बहादूर बिलाला, शैलेश सिंग राजपूत,पोलीस शिपाईदादाभाई साबळे, उमेश पावरा,अजित गावित, राकेश पावरा,सचिन तावडे यांचा पथकाने केली.
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments