Header Ads Widget


सेवा भारती केंद्र संचलित रुग्णपयोगी साहित्य सेवा केंद्राचा शुभारंभ

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:सेवा भारती समितीतर्फे शहादा येथे रुग्णपयोगी साहित्य सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून या सेवा केंद्राचे उद्घाटन जितेंद्र उद्धव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बी. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संपन्न झालेल्या या उद्घाटन सोहळ्यास डॉ. राकेश पाटील, डॉ. सुरेंद्र पाटील, डॉ. परेश पाटील, डॉ. हेमंत नेमाडे, डॉ. नियाज अन्सारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक डॉ. हेमंत सोनी, सेवा भारतीचे विभाग संयोजक कुणाल पाटील आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.पिनाकिन पटेल यांच्या पद्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. उमेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. रुग्णपयोगी साहित्य केंद्राची गरज व उपयोगिता याविषयी त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून माहिती दिली. तर कुणाल पाटील यांनी सेवा भारती समितीच्या कार्याविषयी सविस्तर विवेचन केले. डॉ. बी. डी. पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून सेवा भारतीच्या या उपक्रमाविषयी संचालन समितीचे अभिनंदन करून शहादेकरांना याचा निश्चित लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमांस प्रा. संजय जाधव, डॉ. वसंत पाटील, डॉ. राजेश जैन, डाँ. विवेक पाटील, प्रा. ज्ञानी कुलकर्णी, कल्पेश पटेल, भगवानदास अग्रवाल, नुह नुराणी, ज्ञानेश्वर चौधरी, गुरुचरण राजपाल, सुनील पाटील, सुनील सोमवंशी, प्रा. जीवन जयस्वाल, के.के. सोनार, डॉ. चंद्रभान कदम आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचलन सचिन पत्की यांनी केले. योगेश सोनार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शैलेंद्र पाटील, संजय सोनार, राजेंद्र भावसार, निलेश कापडणे, योगेश सोनार, जितेंद्र पटेल, विजय पाटील, अनिल ठारानी, मनिष मुंडिया, दिपक खेडकर, संजय कासोदेकर यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments

|