Header Ads Widget


प्लास्टिक पत्रावळी अन्नासह खाल्ल्यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात ! प्रशासनाने प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करावे ..

नंदुरबार /प्रतिनिधी: लग्न समारंभ दिवसेंदिवस वाढत असल्याने धूमधडाक्यात सुरू आहेत. अशा लग्नसराईत प्लास्टिक पत्रावळींचा वापर बिनदिक्कत केला जात आहे. या पत्रावळीतील अन्नासह प्लास्टिक खाल्ल्यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्लास्टिक बंदी असताना अशा पत्रावळींची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असताना कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.राज्यात प्लास्टिक बंदी असताना नंदुरबारातील बाजारात प्लास्टिक पत्रावळी व इतर साहित्य बिनदिक्कतपणे उपलब्ध होत आहे. परिणामी, लग्नसराई, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम, तसेच घरगुती कार्यक्रमांसाठी अशा पत्रावळींचा सर्रास वापर केला जात आहे. कार्यक्रम संपल्यानंतर खरकट्या पत्रावळी शहरातील खुल्या जागेत फेकून दिल्या जात आहेत.खुल्या व रस्त्याच्या कडेला फेकलेल्या पत्रावळींवर मोकाट जनावरे ताव मारत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्लास्टिक जनावरांच्या पोटात गेल्याने मृत्युमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनावरांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून प्रशासनाने प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.शहरातील मोकळ्या जागेवर असलेल्या कार्यक्रम, लॉन, मंगल कार्यालयामध्ये लग्न झाल्यानंतर बहुतांश जण या पत्रावळ्या रस्त्यावर फेकून देत असल्याने जनावरे तेथे गोळा होऊन त्यावरील अन्न खातात. अन्नासोबत पत्रावळीचे प्लास्टिक त्यांच्या पोटात जाते व त्यांना आरोग्याचा धोका निर्माण होत आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Post a Comment

0 Comments

|