Header Ads Widget


वार्षिक परीक्षेत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले..

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलात १ मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला असून वार्षिक परीक्षेत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संस्थेचे विश्वस्त व माजी उपनगराध्यक्ष शेख इस्माईल मंसूरी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा.संजय जाधव सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव व जिल्हा स्काऊट आयुक्त वर्षा जाधव संस्थेचे समन्वयक संजय राजपूत संस्थेचे प्रशासकीय प्रमुख प्रा. हिमांशु जाधव सह विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.ध्वजारोहण नंतर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत म्हटले.वसंतराव नाईक विद्यालय व शारदा कन्या विद्यालयात वार्षिक परीक्षेत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.महाराष्ट्र दिनानिमित्त शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच कामगारांना प्राध्यापक संजय जाधव व वर्षा जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

|