नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:नंदुरबार लोकसभा निवडणूक यशस्वीपणे राबविण्यासाठी व मतदानाचा हक्क प्रत्येक मतदाराने बजाविण्याच्या दृष्टीने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा खत्री, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांच्या आदेशान्वये स्वीप कार्यक्रमांतर्गत धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथील आंतरराष्ट्रीय निवासी शाळेत मतदानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे राबविला.या आंतरराष्ट्रीय निवासी शाळेतील इयत्ता 7 वी ते इयत्ता 9 वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तोरणमाळचा दुर्गम भागातील उडद्या, भादल, भादरी, झापी, फलई इत्यादी गावात जावून पथ नाट्य, जनजागृतीसाठी नाविन्यपूर्ण रित्या रॅली काढून स्लोगनच्या माध्यमाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती यशस्वीपणे मोहिम राबविली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा म्हणून आय विल वोट हे स्लोगन विद्यार्थ्यांनी परिपाठाचा वेळी मनोरा द्वारे सादरीकरण केले. लोकशाही मध्ये आपल्याला मिळालेला हक्क म्हणून आपण मतदानाकडे पाहतो. परंतु आपल्या एका मताने काय होणार असे म्हणणारे अनेक जण असतात. थेंबे थेंबे तळे साचे या उक्ती प्रमाणे एक-एका मताने परिवर्तन होण्यास मदत होते. हा उद्देश साध्य करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापक रामलाल पारधी, रवींद्र शिंदे, गंगाराम पावरा, अनिल वळवी, जेष्ठ शिक्षक अनिल देसले, रतिलाल सामुद्रे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. प्रास्ताविक राहुल मावची यांनी केले तर आभार अरुण गावीत यांनी मानले.
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments