Header Ads Widget


भागवत कथा सप्ताह निमित्ताने भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील चितळकर परिवारातर्फे आयोजित केलेल्या भागवत कथा सप्ताह दिनांक २ मे रात्री आठ वाजेपासून शुभारंभ करण्यात आला असून त्यानिमित्ताने सायंकाळी साडेसहा वाजता गजानन महाराज मंदिरापासून भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली.कलश शोभा यात्रेत शेकडो महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सजविलेला रथावर मध्य प्रदेशातील कंचनखेडी येथील कथाकार व भागवताचार्य श्री अनिल शर्मा यांना विराजमान करून भागवत कथेच्या ग्रंथ देखील ठेवण्यात आलेला होता.कलश शोभायात्रा गजानन महाराज मंदिरापासून तर यशोदा नगर मधील नगरपालिका शाळा क्रमांक पाच च्या आवारा पर्यंत काढण्यात आली.शोभा यात्रेत अनेक महिलांनी डोक्यावर कलश ठेवलेले होते.भाविक अत्यंत मंत्रमुक्त होऊन शोभा यात्रेत नाचत होते.महिला भाविकांनी ठिकठिकाणी गरबा नृत्य केले.भागवत सप्ताहाचे आयोजन स्वर्गीय पांडुरंग चितळकर यांचे स्मरणार्थ केले असून नगरपालिका प्राथमिक शाळेच्या आवारात भव्य मंडप लावण्यात आला असून भागवताचार्य श्री अनिल शर्मा यांच्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ बनविण्यात आलेले आहे.भागवत कथा सप्ताह दिनांक २ मे पासून तर ८ मे पर्यंत आयोजित केला आहे.५ मे रोजी कृष्ण जन्माच्या कार्यक्रम होणार आहे.८ मे रोजी समारोप होऊन सकाळी साडेअकरा वाजता भाविकांना प्रसाद वाटप होईल. पहिल्या दिवशी दोन मे रोजी रात्री आठ वाजता भागवत कथा शुभारंभ प्रसंगी बोलतांना भागवताचार्य अनिल शर्मा यांनी महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संतांचे कार्य महान असते.संतांची त्यागाची भूमिका असते जनकल्याणासाठी असते आपण संतांच्या आदर सन्मान केला पाहिजे.भागवत कथा ऐकल्याने चांगले सकारात्मक विचार येतात.अनिल शर्मा यांच्या वाणीने वातावरण भक्तीमय झाले होते.भागवत कथेसाठी शहादा येथील स्वामी समर्थ केंद्रांचे सेवेकरी भक्ती परिवार योगदान देत आहेत.तरी या धार्मिक कार्यक्रमाच्या लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन चित्रकार परिवाराने केले आहे.

Post a Comment

0 Comments

|