Header Ads Widget


श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला सुरुवात...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील मामाचे मोहिदा येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात दिनांक ३० एप्रिल सकाळपासून श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला सुरुवात करण्यात आली असून शेकडो सेवेकरी सेवा देण्यासाठी व दर्शनासाठी येतं आहेत.दिनांक ३० एप्रिल ते ६ मे पर्यंत सप्ताहाचे आयोजन केलेले आहे.सकाळी मंडळ स्थापना स्थापत्य देवता हवन व पाठवाचन घेण्यात आले.सामूहिक पाठ वाचन करतांना स्वामी समर्थ केंद्रात 132 पुरुष व महिला सेवेकरी मिळून गुरुचरित्र पारायण वाचून आप आपला सहभाग नोंदवत आहेत. पहाटे पासून सेवेकरी सेवा रुजू करण्यासाठी येत असतात. गुरुचरित्र पारायण वाचण्यासाठी बसलेले सेवेकरी शहादा, मोहिदा, डोंगरगाव, गोगापूर, भागापूर या परिसरातील आहेत. १ मे रोजी गणेश याग मनोबोध याग नित्य स्वाहाकार तर २ मे रोजी श्री स्वामी याग साकारण्यात आला मुख्य याद्निकी म्हणून म्हणून निलेश सोमवंशी व श्रीकांत पाटील काम पाहत आहे. विशेष यागाला उपस्थित राहणारे केंद्र खेतिया मंदाना जावदा पाडळदा ही केंद्रे आहेत. स्वाहाकार ३ मे रोजी श्री चंडीयाग ४ मे रोजीश्री गीताई याग ५ मे रोजीश्री रुद्र याग श्री मल्हार या व ६ मे रोजी पूर्णा होती दत्त पूजन व समारोप होणार आहे . सप्ताहात प्रहरे सेवा महिला सेवेकरी सकाळी ८ ती रात्री ८ व पुरुष सेवेकरी रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत अखंड करीत आहेत.सप्ताह निमित्त स्वामी समर्थ केंद्राच्या बाहेर मोठा मंडप लावण्यात आलेला आहे.स्वामी सप्ताह सुरळीत पार होण्यासाठी पुरुष सेवेकरी - विजय चव्हाण, तुषारभाऊ शर्मा, विनोद निकम, दिव्येश कुंभार, ललित पाटील, कमलेश लांबोळे, योगेश बच्छाव, धनंजय पाटील, गुंजन कुंभार, नयन कुंभार तर महिला सेवेकरी - लक्ष्मीताई पाटील, अनिता पवार, सीमा पाटील, खुशबू पाटील, अनिता धनगर, सविता अलकरी, दिव्याणी भावसार हे मेहनत घेत आहेत.

Post a Comment

0 Comments

|